Lokmat Sakhi >Beauty > मेहेंदी लावल्याने केस कोरडे होतात? ३ पदार्थ घालून मेहेंदी भिजवा, छान रंग चढून केस होतील मऊ

मेहेंदी लावल्याने केस कोरडे होतात? ३ पदार्थ घालून मेहेंदी भिजवा, छान रंग चढून केस होतील मऊ

Natural Hair Colour For Gray Hair: हिवाळ्यात केसांना मेहेंदी लावली तर केस कोरडे होतात, अशी अनेक जणींची तक्रार असते. त्यासाठीच हा एक सोपा उपाय करून पाहा. (How to avoid dryness of hair because of applying mehendi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2024 09:09 AM2024-01-23T09:09:52+5:302024-01-23T09:10:02+5:30

Natural Hair Colour For Gray Hair: हिवाळ्यात केसांना मेहेंदी लावली तर केस कोरडे होतात, अशी अनेक जणींची तक्रार असते. त्यासाठीच हा एक सोपा उपाय करून पाहा. (How to avoid dryness of hair because of applying mehendi)

How to avoid dryness of hair because of applying mehendi, Natural hair colour for gray hair, Home remedies for white hair | मेहेंदी लावल्याने केस कोरडे होतात? ३ पदार्थ घालून मेहेंदी भिजवा, छान रंग चढून केस होतील मऊ

मेहेंदी लावल्याने केस कोरडे होतात? ३ पदार्थ घालून मेहेंदी भिजवा, छान रंग चढून केस होतील मऊ

Highlights मेहेंदीमुळे केसांना येणारा नारंगी किंवा केशरी रंग आवडत नाही. त्यांच्यासाठी हा उपाय चांगला आहे. कारण यामुळे केसांना काळसर- चॉकलेटी शेड येईल. 

आजकाल खूप कमी वयात केस पांढरे होत आहेत. केस पांढरे होण्याचा आणि वय वाढण्याचा हल्ली काहीही संबंध राहिलेला नाही. कमी वयात केस पांढरे झाले तर केसांवर कोणतेही केमिकल्स असणारे कलर, डाय वापरण्याची भिती वाटते (Home remedies for white hair). त्यामुळे बऱ्याच जणांचा कल मेहेंदीसारखा नैसर्गिक उपाय करण्याकडे असतो. पण सध्या थंडीचे दिवस आहेत. थंडीत आधीच डोक्याची त्वचा, केस कोरडे झालेले असतात. अशातच जर केसांना मेहेंदी लावली तर केस आणखीनच कोरडे होतात, अशी अनेक जणींची तक्रार असते (How to avoid dryness of hair because of applying mehendi) म्हणून असं होऊ नये आणि केसांना छान रंग येऊन ते मऊ- चमकदार व्हावेत, यासाठी काय करता येईल ते आता पाहूया...(Natural hair colour for gray hair)

 

मेहेंदी लावल्यानंतर केस कोरडे होऊ नयेत म्हणून उपाय

मेहेंदी लावल्यानंतर केस कोरडे होऊ नयेत, तसेच केसांना छान रंग यावा यासाठी काय उपाय करता येईल, याविषयीचा एक व्हिडिओ dr.priyanka.abhinav_750 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

हिवाळ्यात करून खायलाच पाहिजेत ही ५ प्रकारची लोणची

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी १ ग्लास पाणी गॅसवर गरम करायला ठेवा. केसांच्या लांबीनुसार पाणी कमी जास्त करा.

यानंतर या पाण्यात १ चमचा चहा पावडर, १ चमचा तांदूळ, १ चमचा कलोंजी टाका आणि ते पाणी उकळू द्या.

 

पाण्याला जेव्हा उकळी येईल तेव्हा त्या पाण्यात १ ते २ चमचे बीटचा किस टाका आणि पाणी उकळून घ्या. गॅस बंद करा आणि पाणी थंड झाल्यानंतर गाळून घ्या.

वजन कमी करून अमृता खानविलकरसारखं फिट व्हायचं? मग करून पाहा ती रोज करते त्या ४ गोष्टी

या पाण्यात मेहेंदी भिजवा आणि ती अर्ध्या तासाने केसांना लावा. साधारण ३ तास मेहेंदी केसांवर राहू द्या आणि त्यानंतर केस धुवून टाका. 

हा उपाय केल्याने केस कोरडे होणार नाहीत. अनेक जणांना मेहेंदीमुळे केसांना येणारा नारंगी किंवा केशरी रंग आवडत नाही. त्यांच्यासाठी हा उपाय चांगला आहे. कारण यामुळे केसांना काळसर- चॉकलेटी शेड येईल. 

 

Web Title: How to avoid dryness of hair because of applying mehendi, Natural hair colour for gray hair, Home remedies for white hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.