Join us  

ओठांच्या बाजूला काळे डाग आहेत, पुरळही येते? तज्ज्ञ सांगतात 7 उपाय, त्रास होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2022 9:02 AM

How To Avoid Hyper-pigmentation Skin Care Tips by Expert : डॉ. जयश्री शरद याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याशी शेअर करतात.

ठळक मुद्देमान आणि कानाच्या मागे परर्फ्युमचा वापर करणे टाळायला हवे. विशेषत: खरखरीत नॅपकीनने चेहरा पुसल्यास ही समस्या वाढते. 

प्रत्येक तरुणीला आपण सुंदर दिसावे, सगळ्यांमध्ये उठून दिसावे असे वाटत असते. आपल्याला मात्र आपल्याला नैसर्गिकपणे जो रंग किंवा रुप मिळाले आहे त्यामध्ये आपण फारसा बदल करु शकत नाही. मात्र मेकअप करुन आपण आपल्या सौंदर्यात काही प्रमाणात नक्कीच वाढ करु शकतो. पण अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी आपला चेहरा खराब होतो आणि त्यामुळे आपल्या सौंदर्यात बाधा येते. कधी आपल्या चेहऱ्याला खूप सुरकुत्या येतात तर कधी चेहऱ्यावर फोड आल्याने आपण खराब दिसतो. काही वेळा आपल्या ओठांच्या आणि नाकाच्या बाजूला काळे डाग पडतात किंवा बारीक फोड येऊन लालसर चट्टे दिसतात, त्यामुळे पूर्ण चेहरा विचित्र दिसायला लागतो. अशावेळी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे आणि काय केल्याने ही समस्या कमी होते याविषयी आपल्याला माहित नसते. डॉ. जयश्री शरद याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याशी शेअर करतात. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्या कायम आपल्या फॉलोअर्सना काही ना काही महत्त्वाची माहिती देत असतात. आताच्या पोस्टमधून ओठांच्या बाजूचे डाग कमी होण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात याविषयी (How To Avoid Hyper-pigmentation Skin Care Tips by Expert)...

(Image : Google)

हे टाळायलाच हवे..

१. ओठांवरुन सतत जीभ फिरवणे टाळायला हवे. अनेकांना ही सवय असते, ज्यामुळे ओठांच्या बाजुचे डाग वाढण्याची शक्यता असते.

२. आपण वापरत असलेल्या टुथपेस्टमध्ये फ्लुओरीड असण्याची शक्यता असते. मात्र त्यानेही आपल्या चेहऱ्याच्या त्वचेला समस्या येऊ शकतात. त्यामुळे याबाबतची तपासणी करायला हवी.

३. अनेकदा आपण मिंट, दालचिनी, लवंग अशा गोष्टी चघळतो. मात्र त्यामुळे हे डाग वाढण्याची शक्यता असते त्यामुळे ते टाळायला हवे.

४. काही जण नियमितपणे च्युईंगम खातात, मात्र ते त्वचेसाठी घातक ठरु शकते.

५. चेहरा सतत पुसणे, विशेषत: खरखरीत नॅपकीनने चेहरा पुसल्यास ही समस्या वाढते. 

६. आपल्यापैकी बरेच जण चेहरा धुण्यासाठी फेसवॉशचा वापर करतात. यामध्ये बरेचदा सोडीयम लॉरीयल सल्फेटचा वापर केलेला असण्याची शक्यता असते. या घटकामुळे चेहऱ्यावरचे काळे डाग वाढू शकतात, त्यामुळे त्याबाबत काळजी घ्यायला हवी.

७. मान आणि कानाच्या मागे परर्फ्युमचा वापर करणे टाळायला हवे. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी