Lokmat Sakhi >Beauty > पावसात भिजल्यानंतर केस फक्त टॉवेलने पुसण्याची चूक करू नका, ४ टिप्स; केस गळणे थांबेल

पावसात भिजल्यानंतर केस फक्त टॉवेलने पुसण्याची चूक करू नका, ४ टिप्स; केस गळणे थांबेल

How to Avoid Monsoon Hair Fall - Monsoon Hair Care Tips : पावसात ओले झाल्यावर केसांची अशी काळजी घ्या; नाहीतर केस गळतीमुळे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2024 02:21 PM2024-06-28T14:21:42+5:302024-06-28T14:22:57+5:30

How to Avoid Monsoon Hair Fall - Monsoon Hair Care Tips : पावसात ओले झाल्यावर केसांची अशी काळजी घ्या; नाहीतर केस गळतीमुळे..

How to Avoid Monsoon Hair Fall - Monsoon Hair Care Tips | पावसात भिजल्यानंतर केस फक्त टॉवेलने पुसण्याची चूक करू नका, ४ टिप्स; केस गळणे थांबेल

पावसात भिजल्यानंतर केस फक्त टॉवेलने पुसण्याची चूक करू नका, ४ टिप्स; केस गळणे थांबेल

ऋतू कोणताही असो, केसांची काळजी प्रत्येक ऋतूत घ्यावी लागते (Monsoon). पावसाळ्यात भिजायला कोणाला नाही आवडत. पावसात एकदातरी भिजण्याची इच्छा प्रत्येकाला होते. अनेक वेळा पावसात भिजल्याने आणि केसांची योग्य काळजी नाही घेतल्यास केसांच्या अनेक समस्या वाढतात (Hair care Tips). अशा परिस्थितीत ऋतूनुसार केसांच्या निगा राखण्याच्या दिनचर्येत काही बदल करणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात केस गळणे टाळण्यासाठी केसांना नियमित तेल लावणे आणि ते स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे (Hair Fall). पण पावसात भिजल्यानंतर केस प्रचंड प्रमाणात गळतात आणि रखरखीत होतात. पावसात भिजल्यानंतर केस गळणे आणि तुटण्याची समस्या होऊ नये म्हणून काही टिप्स फॉलो करा. केस गळती थांबेल(How to Avoid Monsoon Hair Fall - Monsoon Hair Care Tips).

पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल?

शाम्पूने केस धुवा

अनेकांना पावसात भिजायला आवडते. पावसाच्या पाण्यात अनेक रसायने आणि कार्बन असतात. ज्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. शिवाय ते ड्राय आणि रखरखीत दिसतात. त्यामुळे पावसात भिजल्यानंतर शाम्पूने केस धुवा. यामुळे केसांचे नुकसान होणार नाही.

आपण खाताय ती प्लास्टिकची साखर तर नाही ना? FSSAI सांगते, भेसळयुक्त साखर ओळखण्याची १ सोपी ट्रिक

कोमट पाण्याचा वापर

पावसाच्या पाण्याने केस ओले झाले असल्यास साध्या पाण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करा. फक्त केस टॉवेलने कोरडे करू नका. यामुळे केस खराब होऊ शकतात. पावसाच्या पाण्यात मिसळणारे प्रदूषण व रसायने केसांसाठी घातक मानले जाते. यामुळे सर्दी होण्याचाही धोका जास्त असतो.

स्काल्प क्लिन ठेवा

पावसाळ्यात स्काल्पच्या चिकटपणामुळे केस गळण्याची समस्या वाढू शकते. विशेषतः पावसाळ्यात स्काल्प ड्राय राहील याची काळजी घ्या. आर्द्रतेमुळे स्काल्पवर कोंडा किंवा बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे केस नेहमी कोरडे ठेवा.

केसांना तेल जरूर लावा

काही लोक पावसाळ्यात केसांना तेल लावणं टाळतात. परंतु, ऋतू कोणताही असो, शाम्पू करण्यापूर्वी १ ते २ तास आधी, केसांना तेलाने मसाज करा. यामुळे केसांचे मुळे मजबूत होतात, आणि केस चमकदार दिसतात.

थंड - गरम खाल्ल्यावर दातांना झिणझिण्या येतात? १० रुपयाच्या तुरटीचा करा 'असा' वापर; ठणक कमी

केसांना कंडिशनर वापरा

केस शाम्पूने धुतल्यानंतर कंडीशनरचा वापर करा. यामुळे कोरडे दिसणारे केस मऊ आणि रेशमी होतील. आठवड्यातून दोनदा शॅम्पू करताना कंडिशनर लावा. तसेच या ऋतूत हेअर स्ट्रेटनिंग किंवा केस कर्लिंगचा वापर कमी करा.

Web Title: How to Avoid Monsoon Hair Fall - Monsoon Hair Care Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.