Join us  

चेहऱ्यावर बारीक रेषा, सुरकुत्या दिसू लागल्या? शहनाज हुसैन सांगतात ५ उपाय, पन्नाशीतही तरूण दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 5:47 PM

How to Avoid Wrinkles Around Eyes : ब्यूटी एक्सपर्ट शहनाज हुसैन (Shahnaz Hussain Beauty Tips) यांनी सुरकुत्या येऊ नयेत यासाठी काही खास उपाय सांगितले आहेत.

चेहरा डल वयस्कर दिसू लागला याचा अर्थ असा की चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागल्या आहेत. (Skin Collogen) जसजसं वय वाढत जातं तसतसं त्वचा इलास्टिनचे उत्पादन कमी करते डिहायड्रेशन, मॉईश्चरची कमतरता, स्ट्रेस, इन्वायरमेंट्ल एक्सपोजर यांमुळे प्रोटीन्स कमी होऊ लागतात. वयाच्या तिशीनंतर वेळीच त्वचेकडे लक्ष दिले नाही तर त्वचा डल दिसू लागते. (Skin Care Tips) यामुळे त्वचेवर लवकर वयस्करपणा दिसून येतो. (How to Avoid Wrinkles Around Eyes)

रात्रीच्या वेळी स्किन केअर टिप्स फॉलो केल्याने तुम्हाला कोणतीही समस्या उद्भवणार नाही. ब्युटी एक्सपर्ट शहनाज हुसैन (Shahnaz Hussain Beauty Tips) यांनी सुरकुत्या येऊ नयेत यासाठी काही खास उपाय सांगितले आहेत. (How to Prevent Fine Lines Under Your Eyes)

सुरकुत्या रोखण्यासाठी काय उपाय करावे? (Shahnaz Husain Beauty Tips)

१) वेळेआधीच येणारं वृद्धत्व रोखण्यासाठी एंटीऑक्सिडेंट्स, व्हिटामीन्स, खनिजांनी परिपूर्ण असा आहार घ्यायला हवा. फळं, भाज्या लीन प्रोटीन्सचा आहारात समावेश करा. ज्यातून त्वचेला बरीच पोषक तत्व मिळतात. 

केस पातळ झाले-टक्कल पडण्याची भिती? जास्वंदाच्या फुलाचा १ उपाय करा, दाट-सुंदर होतील केस

२) जर तुमची त्वचा खूपच कोरडी असेल तर नारळाच्या तेलाचा वापर करा नारळाचे तेल हातावर घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज  करा. काही  मिनिटांनी चेहरा कॉटनच्या ओल्या कापडाने पुसून घ्या. सुरकुत्या बारीक लाईन्स कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.  ज्यामुळे मॉईश्चर रिटेन करण्यास मदत होईल आणि एजिंग साईन्सही येणार नाहीत.

३) डोळ्यांजवळ या रेषा जास्त दिसून येत असतील तर हलक्या हाताने  डोळ्यांच्या आजूबाजूला मसाज करा. नारळाच्या तेलाने तुम्ही ओठांच्या आजूबाजूच्या त्वचेचीही मसाज करू शकता. 

केस फार पातळ झालेत? तुळशीच्या पानांचा १ जादूई उपाय, कंटाळा येईल इतके दाट-लांब होतील केस

४) व्हिटामीन सी कोलोजन वाढवण्यस फायदेशीर ठरते. यामुळे त्वचा चमकदार दिसते.  व्हिटामीन सी युक्त सिरमचा त्वचेवर वपर करा. मध, दही, एवोकॅडो यांसारख्या पदार्थांचा वापर करून फेशियल मास्क तयार करा ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होईल. एजिंग साईन्स कमी करण्यासाठी सनस्क्रिन एक शक्तिशाली पर्याय आहे. दिवसातून कमीतकमी एसपीएफचे ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावा. त्वचेला हानीकारक किरणांपासून वाचवता येते आणि एजिंग साईन्स उद्भवत नाहीत.

५) हळद एक असा इंग्रेडीएंट आहे. ज्यात सूजविरोधी गुण असतात. याचा वापर करून  तुम्ही अनेक त्वचेच्या समस्या टाळू शकता. हळद आणि मध मिसळून पेस्ट तयार  करा आणि चेहऱ्याला लावा. ज्यामुळे सूज कमी होईल आणि त्वचेवर इंस्टंट ग्लो येईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी