जेव्हाही आपण आपण आपल्या आहारात एंटी ऑक्सिडेंट्स, हेल्दी फॅट आणि पाण्याचा समावेश करतो तेव्हा चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसून येते ग्लोईंग त्वचा हेल्दी डाएटने मिळवात येते. (Tarun Disnyasathi Upay) वाढत्या वयात सुरकुत्या, बारीक लाईन्स अशी वय वाढीची लक्षणं दिसून येता. (How To Be Younger Naturally) जसजसं वय वाढत जाते तसतसं आपल्याला खाण्यापिण्याच्या सवयींकडेही लक्ष ठेवण्याची गरज असते. तरच फाईन लाईक्स आणि सुरकुत्या कमी होऊ शकतात. रोजच्या आहारात अशा काही पदार्थांचा समावेश करावा यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल. कोणते ६ पदार्थ त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवतात ते पाहूया. (Foods For Look Younger Food)
१) लाल शिमला मिरची
लाल शिमला मिरची एंटी ऑक्सिडंसयुक्त असते. व्हिटामीन सी युक्त मिरचीत कॅरोटीनाईड नावाचे शक्तीशाली एंटी ऑक्सिडेट्स असतात. यामुळे स्किन डॅमेज आणि विषारी पदार्थाांच्या प्रभावापासून वाचण्यास मदत होते.
२) पपई
पपई अनेकांना खायला आवडते. थंडीच्या दिवसांत पपई जास्त प्रमाणात खाल्ली जाते. यात व्हिटामीन्स, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. व्हिटामीन ए, सी, के आणि कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरेस असते. यात असे काही एंजाईम्स असतात जे एंटी इंफ्लेटरी स्वरूपात काम करतात.
३) ब्लुबेरी
ब्लुबेरीमध्ये व्हिटामीन ए, व्हिटामीन सी जास्त प्रमाणात असते. याशिवाय यात एंथोसायनिन नावाचा घटक असतो तो एंटी ऑक्सिडेंट म्हणून काम करतो. ब्लूबेरीमुळे गडद निळा रंग येतो. हे शक्तिशाली एंटी ऑक्सिडेंट्स शरीरातील ताण-तणाव दूर करतात.
४) ब्रोकोली
ब्रोकोली एक अशी भाजी आहे ज्यात एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी एजिंग गुण असतात. ब्रोकोलीमध्ये व्हिटामीन सी आणि इतर एंटी ऑक्सिडेंट्स असतात. यात फॉलेट,फायबर्स आणि कॅल्शियमसुद्धा असते.
५) पालक
पालक एक सुपर मॉईश्चराईयजिंग भाज आहे. यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात. जे शरीराला पुरेपूर पोषक तत्व देतात. पालकात व्हिटामीन ए,सी आणि मॅग्गेशियम, आयर्न असते.
६) जलपर्णी
जलपर्णी पोषक तत्वांनी परिपूर्ण असून हे एक हायड्रेडींग रोप आहे. यात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्ननिज, फॉस्फरेस, व्हिटामीन, ए, सी, बी-१ आणि बी-१२ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. हे त्वचेला आतून पोषण देतात. ज्यामुळे सुरकुरत्या कमी होण्यास मदत होते.