कमी वयात तुमचे केस पांढरे झाले असतील (Grey Hair Solution) आणि तुम्हाला केमिकल्सयुकुत उत्पादनांचा वापर करायचा नसेल केस नैसर्गिकरित्या काळे हवे असतील तर तुम्ही सोपा घरगुती उपाय करू शकता. (Kes kale karnyasathi upay sanga)ज्यामुळे केस मुळापासून काळे होतील. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला घरगुती साहित्याचा वापर करावा लागेल. किचनमध्ये ठेवलेल्या साहित्याचा वापर करून तुम्ही केसांना काळेभोर बनवू शकता. (How to blacken Grey Hairs)
वेब एमडीच्या रिपोर्टनुसार व्हिटामीन बी-१२ कमी असणं, हेअर उत्पादनं, परम्नंट हेअर कलर यामुळे सर्वाधिक लोकांचे केस पांढरे होतात. हेअर टॉनिकमुळे केस काळेभोर होण्यास मदत होईल. बाजारात मिळणाऱ्या हेअर डाय आणि हेअर कलरमध्ये केमिकल्स जास्त असतात ज्यामुळे केस डॅमेज होण्याचा धोकाही असतो. या प्रोडक्ट्सच्या वापरामुळे अनेकदा केस वेगाने गळतात. अशात काही घरगुती उपाय तुम्ही केसांचे आरोग्य चांगले ठेवू शकता. (Premature Graying of Hair Causes And Solution)
पोटाच्या टायर्समुळे कंबर मागून जाड दिसते? घरी ४ व्यायाम करा, साईड फॅट घटेल-सुडौल दिसाल
पांढऱ्या केसांना नैसर्गिकरित्या काळे कसे करावे?
केसांना काळे करण्यासाठी तुम्हाला एक घरगुती हेअर टॉनिक लागेल. हे हेअर टॉनिक तयार करण्यासाठी १ बीट, २ आवळे, १० ते १२ कढीपत्ते देठ वापरा. हे हेअर टॉनिक तयार करण्यासाठी बीट सोलून मग किसून घ्या नंतरर आवळा सुद्धा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या नंतर एका कढईत एक ग्लास पाणी घाला. त्यात किसलेलं बीट, आवळा आणि कढीपत्ता घाला. नंतर हे पाणी गॅसवर उकळण्यासाठी ठेवा.
१० ते १२ मिनिटं हाय फ्लेमवर उकळल्यानंतर गॅस बंद करा. हे टॉनिक थंड झाल्यानंतर गाळून वेगळं करून घ्या. हे टॉनिक आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांना व्यवस्थित लावा. माईल्ड शॅम्पूने केस धुवा. यातील पोषक त्तव केसांना मुळापासून काळे बनवतील. घरगुती हेअर टॉनिक वापरल्याने केसांना मुळापासून पोषण मिळते. रक्तप्रवाह चांगला राहतो, केसांना फाटे फुटणं, केस गळणं कमी होतं. नवीन केसांची वाढ होण्यास हा घरगुती उपाय उत्तम ठरतो.