आजकाल कमी वयाच्या लोकांमध्ये केस पांढरे होण्याची समस्या दिसून येतेय. पांढरे केस काळे करण्यासाठी सध्या ग्लोबल कलर, हायलाईट करणं लोक पसंत करतात. (Natural Home Remedies For Grey Hair) पण केमिकल्स ट्रिटमेंट्समुळे केस कोरडे पडणं, केस गळणं यांसारख्या समस्या वाढत आहेत. (How to Blacken White Hair Naturally)
अनेकदा चुकीच्या सवयी, अन्हेल्दी लाईफस्टाईलमुळे केस पांढरे व्हायला सुरूवात होते. केस पांढरे झाल्यानंतर अनेकांचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. (Can White Hair Turn Black Again) लोक हेअर डायचा वापर करतात पण त्यामुळे कोरडेपणा वाढत जातो. काळेभोर केस मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. (Natural Home Remedies For Grey Hair)
नारळाचं तेल केसांसाठी एक गुणकारी औषध समजले जाते. यामुळे फक्त केस शायनी होत नाही तर हेअर फॉलचा त्रासही जातो. जर तुम्ही लिंबामध्ये मिसळून नारळाचं तेल केसांना लावलं तर केस काळे करण्यास मदत होईल आणि केसांना पोषणही मिळेल.
लिंबाचा वापर नेहमी केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी केला जातो. यामुळे केसांमधील कोंडा सहज दूर होतो. याशिवाय केसांच्या वाढीसाठीही लिंबू फायदेशीर आहे. केस वेळेआधी पांढरे होऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही केसांना लिंबू लावू शकता. यात अनेक एंटी फंगल प्रॉपर्टीज असतात. (How to Turn Grey or White Hair Black Naturally)
चेहरा अजिबात काळा पडणार नाही; आंघोळीनंतर १ काम करा, दिवसभर फ्रेश दिसेल त्वचा
नारळाचं तेल आणि कढीपत्ता
नारळाचं तेल आणि कढीपत्ता वापरून तुम्ही केस काळेभोर करू शकता. सगळ्यात आधी १० ते १५ कढीपत्ते धुवून घ्या. एका वाटीत ३ ते ४ चमचे नारळाचे तेल गरम होण्यासाठी ठेवा. त्यानंतर यात कढीपत्ता घाला. १ ते २ मिनिट तेल गरम झाल्यानंतर तेल स्काल्पला लावून मसाज करा. २ ते ३ तासांनी केस शॅम्पूनं स्वच्छ धुवा.
नारळाचे तेल आणि काळे तीळ
नारळाचं तेल आणि काळे तीळ वापरून तुम्ही केस काळे करू शकता. रात्रभर १ चमचा काळे तीळ ३ ते ४ चमचे नारळाच्या तेलात भिजवायला ठेवा. सकाळी उठल्यानंतर तेल हलकं गरम करून स्कॅल्पवर लावा आणि या तेलानं मसाज करा. हा उपाय नियमित केल्यास केस काळे होण्यास मदत होईल आणि इन्फेक्शनचा धोकाही टळेल.
केस पिकलेत, केमिकल डाय नको वाटतो? मेहेंदीत हा पदार्थ मिसळून लावा; काळेभोर राहतील केस
मेथीचे दाणे
मेथीचे दाणे खोबरेल तेलात मिसळूनही सहज लावता येतात. ते वापरण्यासाठी 3 ते 4 चमचे खोबरेल तेल गरम करण्यासाठी ठेवा. त्यात १ चमचा मेथीचे दाणे टाका आणि तेल गरम होऊ द्या. आता गॅस बंद करा आणि तेल कोमट होऊ द्या. त्यानंतर हे तेल गाळून बाटलीत भरून घ्या. आवश्यकतेनुसार या तेलाने केसांना मसाज करा. हे तेल केसांना पोषण देते आणि केसांची जलद वाढ होण्यास मदत करते.