चेहरा उजळ दिसावा, चेहऱ्यावरचे केस दिसू नये यासाठी पार्लरमध्ये जावून ब्लिच (bleach) केलं जातं. पण सतत ब्लिच केल्यानं त्वचा खराब (bleach effects on skin) आणि रुक्ष होते. ब्लिचमुळे चेहरा चमकदार दिसण्याऐवजी चेहऱ्याची नैसर्गिक चमक हरवते. चेहऱ्याचा पोत खराब होवून चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. ब्लिचमुळे त्वचेला ॲलर्जी होवून त्वचा ओढल्यासारखी दिसते. सुंदर दिसण्याचा उपाय म्हणून ब्लिच करायला गेल्यास त्वचेचं नैसर्गिक सौंदर्य धोक्यात येतं. सतत ब्लिच केल्यानं चेहऱ्याची त्वचा सूर्याचे अती नील किरण, प्रदूषण यांच्याप्रती अधिकच संवेदनशील होवून खराब होते. पार्लरमधील ब्लिचचे हे हानिकारक परिणाम टाळण्यासाठी सौंदर्य तज्ज्ञ शहनाझ हुसैन (Shahnaz Husain) घरच्याघरी ब्लिच (homemade bleach) करण्याचे सोपे उपाय सांगतात. त्यांच्या मते दूध, केशर, दही, हळद, लिंबू, काकडी, टमाटा, पपई, मुल्तानी माती आणि गुलाब पाणी या अशा गोष्टी (tips for bleach skin with kitchen ingredients) आहेत ज्यांच्यामुळे चेहरा उजळ तर होतोच शिवाय चेहऱ्याच्या त्वचेचं पोषण होवून त्वचेचा पोतही सुधारतो.
Image: Google
घरच्याघरी ब्लिच करण्याचे उपाय
1. गरम दुधात 3-4 केशर काड्या घालाव्यात. दोन तीन तास केशर काड्या दुधात भिजू द्याव्यात. नंतर हे मिश्रण कापसाच्या बोळ्यानं चेहऱ्याला लावावं. हा उपाय नियमित केल्यास चेहऱ्याचा रंग उजळतो.
2. दह्यात चिमूटभर हळद मिसळून हे मिश्रण चेहेऱ्यास लावावं. अर्ध्या तासानं चेहरा धुवावा. यात लिंबांची सालं वाळवून त्याची मिक्सरमधून पावडर करावी. दह्यात लिंबाच्या सालाची पावडर आणि हळद मिसळून हे मिश्रण चेहऱ्यास लावल्यास चेहऱ्याचा रंग तर उजळतोच शिवाय चेहऱ्यावरील मुरुम पुटकुळ्याही बऱ्या होतात.
3. लिंबाचा रस आणि काकडीचा रस समप्रमाणात घ्यावा. हे दोन्ही एकत्र करुन हे मिश्रण चेहऱ्यास लावावं. 20 मिनिटांनी चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. हा उपाय नियमित केल्यास थोड्याच दिवसात त्वचेचा रंग उजळलेला दिसतो.
Image: Google
4. काकडी किसून घ्यावी. किसलेल्या काकडीत थोडं दही घालावं. काकडी आणि दह्याचं हे मिश्रण चेहऱ्यास लावून ते 20 मिनिटं ठेवावं. तेलकट त्वचेसाठी लेप फायदेशीर आहे. या लेपामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जातं आणि त्वचा स्वच्छ होते.
5. टमाट्याचा गर रोज चेहऱ्यास लावून 20 मिनिटं ठेवावा. टमाट्यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जातं. उन्हानं काळवंडलेली त्वचा उजळ होण्यास मदत मिळते.
6. दह्यात किसलेली काकडी आणि पिकलेल्या पपईचा गर घालावा. त्यात थोडा लिंबाचा रसही घालावा. हे मिश्रण चेहरा आणि मानेस लावावं. अर्ध्या तासानं चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. यात ओट्स पावडर घातल्यास त्वचा मऊ मुलायम होवून तजेलदार दिसते.
Image: Google
7. तेलकट त्वचेसाठी घरच्याघरी ब्लीच करण्यासाठी मुल्तानी माती घ्यावी. त्यात गुलाब पाणी आणि लिंबाचा रस घालावा. सर्व जिन्न्स एकजीव करुन हे मिश्रण चेहऱ्यास लावावं. लेप वाळला की चेहरा पाण्यानं धुवावा. या लेपामुळे त्वचेचा तेलकटपणा कमी होतो आणि त्वचा चमकते.
8. थोडे बदाम घ्यावेत. ते मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावेत. दह्यात बदामाची पावडर एकत्र करुन हे मिश्रण चेहऱ्यास लावावं. 20 मिनिटांनी चेहऱ्याला हलका मसाज करत चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.