चेहऱ्याची सुंदरता (Diwali Beauty Tips) आणि चमक वाढवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. (Diwali Special Beauty Tips) कधी पार्लरला जातात, कधी ब्लीच तर कधी फेशियल यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. त्वचेचचं टॅनिंग रिमुव्ह करण्यासाठी महिला ब्लीचचा वापर करतात. यामुळे त्वचेच्या मृतपेशी रिपेअर होतात. (Simple Ways to Make Natural Skin Bleach) ब्लीचमुळे त्वेचचा रंग उजळण्यास मदत होते. यामुळे त्वचेला सावळे बनवणारा मेलेनिनचा स्तर कमी होण्यास मदत होते. ब्लीचच्या वापराने त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. (How to Bleach Your Face at Home)
काही महिलांना पार्लरमध्ये जाऊन ब्लीच किंवा फेशियल करायची फारच भिती वाटते म्हणून त्या घरच्याघरी ब्लिचचा पॅक आणून चेहरा उजळवण्याचा प्रयत्न करतात. ब्लिचमुळे स्किन टोनची समस्या दूर होते. घरी ब्लिच करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असते. घरात ब्लिच करताना कोणत्या स्टेप्स तुम्ही सहज फॉलो करू शकता ते पाहूया. (How to Bleach Your Face at Home Naturally) बाहेरून ओलिव्हिया, फेम किंवा इतर ऑर्गेनिक ब्रॅण्ड्सचे ब्लिच घरी आणून तुम्ही ब्लिच करू शकता ३० ते १०० रूपयांच्या आत तुम्हाला हे पॅकेट्स मिळतील.
स्टेप-१
ब्लिच करण्याआधी चेहऱ्याची त्वचा स्वच्छ असणं गरजेचं असते अन्यथा ब्लीचा पुरेपूर फायदा मिळत नाही. यामुळे त्वचेवर खाजही येऊ शकते. यासाठी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. प्री ब्लीच क्रिम लावा आणि १० मिनिटं हलक्या हातानं मसाज करा. त्वचा सॉफ्ट झाल्यानंतर एका वाटीत १ ते २ चमचा ब्लिच आणि २-३ चिमूट एक्टिव्हेटर मिसळून चेहऱ्याला लावा. एक्टिव्हेटर जास्त प्रमाण घालणं टाळा.
मान-पाठीवर टॅनिंग, मळ साचलाय? खोबरेल तेलात 'हा' पदार्थ मिसळून लावा, ५ मिनिटांत टॅनिंग दूर
स्टेप- २
ब्युटी एक्सपर्ट्सच्यामते जर तुम्ही घरी ब्लिच करत असाल तर पॅच टेस्ट नक्की करा. कधीत ब्लीच थेट चेहऱ्यावर लावू नका. ब्लिच लावताना हलकं इरिटेशं होणं स्वाभाविक आहे. पण जास्त जळजळ होत असेल तर समजून जा की ब्लिच तुमच्या त्वचेला सुट होणारं नाही. अशावेळी ब्लीच चेहऱ्यावर लावणं टाळा.
स्टेप-३
जेव्हा तुम्ही ब्लीच त्वचेवर लावताय तेव्हा टायमिंगकडे लक्ष देणं फार महत्वाचे आहे. ब्लीच १५ मिनिटांपेक्षा जास्त चेहऱ्यावर लावलेले ठेवू नका. ब्लिच सुकल्यानंतर एका नरम सुती कापडाने आपला चेहरा स्वच्छ करा. १५ मिनिटांपेक्षा अधिकवेळ ब्लिच चेहऱ्यावर ठेवल्यानं त्यातील रिएक्टरमुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते. याव्यतिरिक्त खाज आणि त्वचेशी संबंधित इतर समस्याही उद्भवू शकता.
केस प्रचंड गळतात-पातळ झाले? फक्त ५ पदार्थ न चुकता खा, पटापट वाढतील-दाट होतील केस
ब्लीच करण्याआधी हे लक्षात ठेवा
चेहऱ्यावर पिंपल्स किंवा डाग असतील तर ब्लीच लावू नका. यामुळे संक्रमण होऊ शकते किंवा चेहऱ्यावर डागही येऊ शकतात. याव्यतिरिक्त थ्रेडींग, वॅक्सिंगनंतर ब्लिचचा वापर केल्यास जळजळ किंवा दाणे येण्याची समस्या अधिक जाणवू शकते.