Join us  

सकाळी शाळेत जाण्याच्या गडबडीत लेकीच्या वेण्या घालायला खूपच वेळ लागतो? १ उपाय- झटपट घाला सुंदर वेण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2024 5:41 PM

How to braid really quickly?: सकाळच्या गडबडीत मुलींच्या वेण्या घालणं हे खूपच कठीण काम वाटत असेल तर ते सोप्या पद्धतीने कसं करायचं ते पाहा...(How to speed up braiding process of your girl child?)

ठळक मुद्देएखाद्या दिवशी रात्री मुलींच्या डोक्याला तेल लावणं आणि केसांमधला गुंता काढणं राहून गेलं असेल तर दुसऱ्या दिवशी त्या आंघोळीला जाण्यापुर्वी त्यांच्या डोक्याला तेल लावून द्या.

ज्या घरात शाळेत जाणारे मुलं- मुली असतात, त्या घरात सकाळी- सकाळी उडालेली गडबड अगदी बघण्यासारखी असते. मुलांच्या आईची परिस्थितीतर खूपच अवघड असते. एकीकडे मुलांना उठवा, पटापट आवरण्यासाठी त्यांच्या मागे लागा, दुसरीकडे स्वयंपाक घरातली आघाडी सांभाळा, स्वयंपाक करत करतच मुलांना, नवऱ्याला नाश्ता द्या, मुलांचे, नवऱ्याचे डबे भरा, त्यात कोणाला काय पाहिजे, काय सापडत नाही ते पाहा.... आणि एवढं सगळं करून मग शाळेत जाणारी जर मुलगी असेल आणि तिचे केस बऱ्यापैकी लांब असतील तर मग तिच्या आईच्या मागचं काम आणखीन वाढतं..(How to speed up braiding process of your girl child?)

 

कारण आधी केसांमधला गुंता काढा आणि त्यानंतर वेण्या घाला, त्यांना रबर, रिबिन, क्लिप लावा, असं सगळं करण्यात खूप वेळ जातो. त्यामुळे मग हल्ली तर बऱ्याच आई त्यांच्या मुलींना थेट केस कापून टाकण्याचा सल्ला देतात.

वाटली डाळ गचका होते- छातीत बसते? 'ही' रेसिपी ट्राय करा! डाळ होईल मोकळी, चटपटीत

मुलींना मात्र केस वाढविण्याची खूप हौस असते. तुमच्याही मुलीला लांब केसांची हौस असेल तर तिला केस वाढवू द्या. फक्त ३ गोष्टी मात्र नियमितपणे करा (How to braid really quickly?). यामुळे तुमच्या मुलींच्या केसांमध्ये अजिबात गुंता होणार नाही आणि अगदी झटपट वेण्या घालून होतील. त्यात खूप वेळ जाणार नाही.

 

मुलींच्या वेण्या झटपट घालून होण्यासाठी टिप्स...

१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुली शाळेत २ वेण्या घालून जात असतील तर आठवडाभर शक्यतो त्यांच्या दोन वेण्याच घाला. रविवारच्या दिवशी मुलींना हवी ती हेअरस्टाईल करण्याची परवानगी द्या. यामुळे केसांमध्ये जास्त गुंता होत नाही. तसेच केसांचे दोन वेण्यांचे वळण तसेच राहाते. त्यामुळे झटपट वेणी घालून होते.

रोजच्या स्वयंपाकासाठी 'हे' तेल मुळीच वापरू नका! पाहा आरोग्यासाठी धोकादायक असणारे तेलाचे प्रकार

२. सकाळच्या गडबडीत मुलींना तेल लावत बसू नका. रात्री झोपण्यापुर्वी त्यांना व्यवस्थित तेल लावून द्या. त्यानंतर गुंता काढून ठेवा आणि सकाळी त्या ज्या पद्धतीच्या वेण्या घालून शाळेत जाणार आहेत, तशाच वेण्या रात्री घालून ठेवा. यामुळे मग सकाळी वेणी घालणं जास्त अवघड जात नाही.

डोक्यात सतत निगेटिव्ह विचार येतात, मन अजिबात शांत नसतं? १ सोपा उपाय- नकारात्मकता कमी होईल 

३. एखाद्या दिवशी रात्री मुलींच्या डोक्याला तेल लावणं आणि केसांमधला गुंता काढणं राहून गेलं असेल तर दुसऱ्या दिवशी त्या आंघोळीला जाण्यापुर्वी त्यांच्या डोक्याला तेल लावून द्या. आंघोळीमुळे केस ओलसर होतात. त्यामुळे केसांना एक प्रकारचा मऊपणा येतो आणि नंतर गुंता झटपट निघतो. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी