Lokmat Sakhi >Beauty > केस खूपच गळत आहेत ? 'या' सोप्या पद्धतीने केस विंचारल्यास केस गळणे होईल बंद...

केस खूपच गळत आहेत ? 'या' सोप्या पद्धतीने केस विंचारल्यास केस गळणे होईल बंद...

How To Comb Your Hair When You Have Hair Fall : शॅम्पू, तेल, कंडिशनर बदलूनही केस गळतीच्या समस्येत काही फरक दिसत नसेल, तर तुम्हाला केस विंचरण्याच्या योग्य पद्धतींकडे लक्ष देणे गरजेचे आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2023 12:22 PM2023-09-30T12:22:25+5:302023-09-30T12:55:46+5:30

How To Comb Your Hair When You Have Hair Fall : शॅम्पू, तेल, कंडिशनर बदलूनही केस गळतीच्या समस्येत काही फरक दिसत नसेल, तर तुम्हाला केस विंचरण्याच्या योग्य पद्धतींकडे लक्ष देणे गरजेचे आहे...

How To Brush Your Hair: 7 Tips For Brushing Your Hair The Right Way. | केस खूपच गळत आहेत ? 'या' सोप्या पद्धतीने केस विंचारल्यास केस गळणे होईल बंद...

केस खूपच गळत आहेत ? 'या' सोप्या पद्धतीने केस विंचारल्यास केस गळणे होईल बंद...

केस हे अतिशय नाजूक असतात. केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी वेळोवेळी त्यांची योग्य देखभाल करणे गरजेचे असते. केसांची योग्य ती स्वच्छता व काळजी न घेतल्यास केसांच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. केसांच्या सगळ्या समस्यांपैकी एक कॉमन समस्या म्हणजे केसगळती. आजकाल केसगळतीची समस्या तरुणांपासून ते घरांतील वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्यांनाच सतावते. केस गळणे (Hair Fall Problem) ही एक सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे; जूने केस गळतात आणि त्यांच्या जागेवर नवीन केस येतात. परंतू, जेंव्हा केस गळण्याचे प्रमाण जास्त असते किंवा केस गळण्याच्या प्रमाणात नवीन केस येत नाहीत, तेंव्हा ती एक समस्या होऊन बसते. सतत होणारी ही केसगळती थांबवण्यासाठी आपण अनेक उपाय करुन पाहतो( Brushing Hair Guide To Keep All Hair Problems Away).

केस गळती रोखण्यासाठी आपण महागडे शॅम्पू, कंडिशनर यांचा वापर करतो. एवढे करुन आपण थांबत नाही तर काही घरगुती उपायांची देखील मदत घेतो. केस गळण्याची ही समस्या सुरुवातीला लहान समस्या जरी असली तरी तिच्याकडे वेळीच लक्ष दिलेले (7 Amazing Benefits Of Brushing Hair & How To Do It Perfectly) बरे असते. केस गळती रोखण्यासाठी आपण अनेक शॅम्पू, कंडिशनर, तेल बदलून त्यांचा वापर करुन पाहतो. परंतु अनेक उपाय करूनही जर केस गळतीची समस्या थांबत नसेल तर तुम्हांला केस विंचरण्याच्या योग्य पद्धतीकडे (How to brush your hair the right way) लक्ष देणे गरजेचे असते. काहीवेळा चुकीच्या पद्धतीने (Brushing and Combing Your Hair) केस विंचरल्यास आपले बरेच केस तुटतात किंवा गळतात. केसांत योग्य प्रकारे कंगवा करून केस गळण्याची समस्या बर्‍याच प्रमाणात कमी करता येऊ शकते(How To Brush Your Hair: 7 Tips For Brushing Your Hair The Right Way).

केस विंचरण्याची योग्य पद्धत कोणती ?

१. कायम जाड दातांचा कंगवा वापरावा :- केस विंचरताना किंवा केसांतील गुंता सोडवताना जाड किंवा मोठ्या दातांचा कंगवा वापरावा. मोठ्या दातांचा कंगवा वापरल्याने केसांतील झालेला गुंता लगेच सुटतो. तसेच यामुळे केस जास्त तुटत नाहीत. बारीक दातांच्या कंगव्याने केस विंचरल्यास एकाचवेळी भरपूर केस तुटण्याची शक्यता असते. केसांच्या मुळांना अधिक त्रास किंवा इजा होऊ न देता केसांतील गुंता बोटांनी किंवा मोठ्या दातांच्या कंगव्याने सोडवा. 

हेअर ब्रश स्वच्छ करण्यासाठी ६ सोपे उपाय, एका मिनिटांत कळकट - घाणेरडा हेअर ब्रश होईल स्वच्छ...

२. स्कॅपलची मालिश करा :- केसांसोबतच स्कॅल्पची देखील काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे असते. केसांना मसाज करण्यासोबतच नेहमी स्कॅल्पला देखील मसाज करावा. केसांसोबत स्कॅल्प निरोगी ठेवण्यासाठी टाळूला देखील मसाज करा, त्यामुळे स्कॅल्पचे ब्लड सर्क्युलेशन वाढते. थोडेसे तेल घेऊन हाताच्या बोटांनी गोलाकार आकारात मसाज करुन घ्यावा. 

३. केसांतून हळूहळू कंगवा फिरवा :- केस विंचरताना केसांतून कंगवा हळूहळू फिरवा. कंगव्याने केस जोरात ओढणे, कंगव्यावर केस घसाघसा घासणे ही केस गळण्याची मुख्य कारणं असू शकतात. त्यामुळे केस विंचरताना किंवा केसातील गुंता सोडवताना केसांतून हळूहळू कंगवा फिरवा. 

देवघरातली पांढरीशुभ्र गोष्ट फार मोलाची, डोक्याला लावा केसातला कोंडा होईल काही दिवसांत गायब...

४. दररोज कंगव्याने केस विंचरा :- अनेकजण दररोज केसांना कंगव्याने विंचरणे आवश्यक मानत नाहीत, जे केस तुटण्याचे एक प्रमुख कारण आहे. असे केल्याने टाळूमध्ये ब्लड सर्क्युलेशन योग्य प्रकारे होत नाही. म्हणून दररोज किमान दिवसांतून २ वेळा तरी कंगवा करणे महत्वाचे असते. याशिवाय केसांतून कंगवा फिरवल्याने टाळूतून नैसर्गिक तेल निघते, ज्यामुळे केसांना मॉइश्चरायझेशन मिळते. 

५. केसांच्या टिप्स पासून विंचरण्यास सुरुवात करा :- केस विंचरताना सर्वातआधी केसांच्या टिप्स पासून विंचरण्यास सुरुवात करावी. केस विंचरताना केसातील खालच्या बाजूस असलेला गुंता आधी काढून घ्यावा. त्यानंतर वरील केस विंचरावेत यामुळे केसांना तुटण्यापासून किंवा गळण्यापासून आपण वाचवू शकतो. 

बिया इतक्या छोट्या पण केसांच्या सौंदर्यात पडेल भर...आता घरीच बनवा केसांसाठी होममेड नैसर्गिक कंडिशनर !!

६. केसांचे लहान भागात विभाजन करा :- केसांचा गुंता सोडवण्यासाठी केसांचे सर्वातआधी लहान लहान भागात विभाजन करून घ्यावे. एकदम एकाचवेळी सगळ्या केसांचा गुंता एकत्रित सोडवण्याचा प्रयत्न करु नये. असे केल्यास केसांचा गुंता सुटला जाणार नाही यासोबतच एकाचवेळी भरपूर प्रमाणांत केस तुटतील. 

७. ओले केस विंचरु नका :- केस धुतल्यानंतर लगेच ओले केस विंचरण्याची चूक करू नका, कारण त्यामुळे केस जास्त तुटतात. ओले केस हे कमकुवत असतात म्हणून केस ओले असताना विंचरु नयेत.

Web Title: How To Brush Your Hair: 7 Tips For Brushing Your Hair The Right Way.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.