Lokmat Sakhi >Beauty > टाचांना भेगा पडल्या ? ३ स्टेप्सचा सोपा उपाय, टाचा होतील कोमल - मऊ आणि सुंदर...

टाचांना भेगा पडल्या ? ३ स्टेप्सचा सोपा उपाय, टाचा होतील कोमल - मऊ आणि सुंदर...

3 Easy Ways To Treat Cracked Heels : हिवाळ्यात पायांना पडणाऱ्या भेगा ही एक कॉमन समस्या आहे, महिलांना तर हा हमखास होणारा त्रास आहे, यासाठीच एक उत्तम पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2023 05:29 PM2023-11-10T17:29:09+5:302023-11-10T17:42:02+5:30

3 Easy Ways To Treat Cracked Heels : हिवाळ्यात पायांना पडणाऱ्या भेगा ही एक कॉमन समस्या आहे, महिलांना तर हा हमखास होणारा त्रास आहे, यासाठीच एक उत्तम पर्याय...

HOW TO CARE FOR DRY, CRACKED HEELS, 3 Ways to Heal and Prevent Cracked Heels | टाचांना भेगा पडल्या ? ३ स्टेप्सचा सोपा उपाय, टाचा होतील कोमल - मऊ आणि सुंदर...

टाचांना भेगा पडल्या ? ३ स्टेप्सचा सोपा उपाय, टाचा होतील कोमल - मऊ आणि सुंदर...

सगळ्याच ऋतुंमध्ये आपल्याला त्वचेची काळजी घ्यावी लागते. असे असले तरीही हिवाळ्यात आपल्याला त्वचेची अधिक जास्त काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात वाढत्या थंडीने आपल्याला त्वचेच्या अनेक समस्या किंवा अनेक आजार उद्भवतात. जर आपण हिवाळ्यात त्वचेची योग्य ती काळजी घेतली नाही तर त्वचेचे अधिक नुकसान होऊ शकते. हिवाळ्यात त्वचेवर रॅश येणे, अंगाला खाज सुटणे, त्वचा पांढरी पडणे यांसारख्या त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. याचबरोबर हिवाळ्यात टाचांना भेगा पडून टाचा, पाय दुखू लागण्याची ही कॉमन समस्या सगळ्यांनाच जाणवते. पायांना भेगा (How can I stop my heels from cracking in winter season) पडण्याचा हा त्रास अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. हा त्रास बर्‍याच प्रमाणात महिलांमध्ये जास्त होत असल्याचे दिसून येते(HOW TO CARE FOR DRY, CRACKED HEELS).

पायांना भेगा पडण्याच्या या छोट्याशा समस्येकडे वेळीच लक्ष दिले नाही तर या भेगा अजून वाढू लागतात. काहीवेळा पायाच्या टाचेला होणार्‍या भेगा इतक्या खोलवर जातात आणि मग मात्र त्या जागी दुखू लागते. याचबरोबर कधीकधी ही समस्या एवढी गंभीर होते की घरात देखील अनवाणी चालणे शक्य होत नाही. पायांना पडणाऱ्या भेगांची (What is the fastest way to heal cracked heels) ही समस्या दूर करण्यासाठी आपण अँटी हिल क्रॅक क्रिम्स किंवा इतर स्किन रिपेअर क्रिम्सचा वापर करतो. याचा काही अंशी परिणाम होऊन भेगा बऱ्या होतात परंतु यावर आपण एक सोपा घरगुती उपाय करु शकतो(3 Ways to Heal and Prevent Cracked Heels).

सोप्या ३ स्टेप्समध्ये पायांवरील भेगा होतील कायमच्या दूर...      

१. एका मोठ्या टबमध्ये थोडेसे कोमट पाणी घेऊन त्यात सौम्य बॉडी वॉशचे काही थेंब घालून घ्यावे. त्यानंतर त्या पाण्यांत एक पाकीट इनो घालावे. हे सगळे मिश्रण पाण्यात व्यवस्थित विरघळू द्यावे. त्यानंतर या पाण्यात पाय बुडवून किमान १० ते १५ मिनिटे बसावे. 

चुकूनही गुलाब पाण्यात हे ४ पदार्थ मिसळून चेहऱ्याला लावू नका, ऐन दिवाळीत चेहरा होईल निस्तेज आणि खरखरीत...

२. यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये एका छोट्या बाऊलमध्ये २ टेबलस्पून कॉफी, १ टेबलस्पून साखर घेऊन आपल्या ओल्या पायांवर व भेगांवर या मिश्रणाने स्क्रबिंग करुन घ्यावे. स्क्रबिंग करताना भेगांवर हलक्या हाताने स्क्रबिंग करुन घ्यावे. संपूर्ण पायांवर या मिश्रणाने स्क्रबिंग झाल्यावर २ ते ३ मिनिटे ते पायांवर तसेच राहू द्यावे. 

मेथीच्या दाण्यांचे ३ सोपे उपाय, केसांच्या सर्व समस्यांवर एकच असरदार - गुणकारी इलाज...

अभ्यंगस्नानासाठी नेमके कोणते तेल वापरावे ? तेल गरम करण्याची योग्य पद्धत, त्वचेला होतील अनेक फायदे...

३. आता तिसऱ्या स्टेपमध्ये, एका बाऊलमध्ये २ टेबलस्पून बटाट्याचा रस घेऊन त्यात १ टेबलस्पून मुलतानी माती मिसळून त्याची घट्टसर पेस्ट बनवून घ्यावी. ही पेस्ट संपूर्ण पायांना हलक्या हातांनी लावून घ्यावी. ही पेस्ट पायांना लावल्यानंतर किमान २ ते ३ मिनिटे पायांना मसाज करावा. मसाज केल्यानंतर हा मास्क किमान १५ मिनिटे पायांवर लावून ठेवावा. त्यानंतर एका टबमध्ये स्वच्छ पाणी घेऊन पाय व्यवस्थित धुवून स्वच्छ पुसून कोरडे करून घ्यावेत. 

अशाप्रकारे आपण हा झटपट साधा - सोपा उपाय वापरून सोप्या ३ स्टेप्समध्ये पायांच्या भेगा दूर करु शकतो.

Web Title: HOW TO CARE FOR DRY, CRACKED HEELS, 3 Ways to Heal and Prevent Cracked Heels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.