Join us  

कपडे असे निवडा की आपण आपोआप स्लिम- फिट दिसू! त्यासाठी 5 युक्त्या, निवडा योग्य कपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 2:10 PM

Beauty Tips: स्लिमट्रीम दिसण्यासाठी कपड्यांचीही नक्कीच मदत होऊ शकते. म्हणूनच तर जाड मुलींनी (fat girls should avoid this clothing) कपडे निवडताना थोडी काळजी घेतली तर त्या आहेत, त्यापेक्षा नक्कीच अधिक बारीक दिसू शकतात..

ठळक मुद्देजाड मुलींनी अधिक जाड दिसू नये किंवा बारीक मुलींनी अगदीच काडी दिसू नये, यासाठी कपडे कसे घालावे  किंवा निवडावे, त्याच्या या ५ टिप्स..

आपण कधीकधी बेफिकीरीने कोणतेही, कसेही कपडे घालत असलो, तरी कपडे आपलं व्यक्तिमत्त्व ठरविण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात. कधीकधी आपण काही बोललो नाही, तरी चालते... पण आपल्याविषयी माहिती देण्यासाठी आपले कपडे मात्र पुरेसे ठरतात.. त्यामुळेच तर कपड्यांची निवड अतिशय काळजीपुर्वक आणि चपखलच झाली पाहिजे. (how to choose outfits?)

 

व्यक्तिमत्व ठरविण्यासाठीच नाही, तर आपण जाड दिसतोय की बारीक, फ्रेश दिसतोय की डल हे देखील बऱ्याचदा कपड्यांवर अवलंबून असते. बऱ्याचदा आपलं आपल्यालाच जाणवतं की एखादा ड्रेस घातल्यावर आपण अधिकच यंग आणि स्लिम दिसतो आहोत, तर कधी एखाद्या ड्रेसमध्ये आपण उगीच प्रौढ दिसू लागतो. म्हणूनच तर जाड मुलींनी अधिक जाड दिसू नये किंवा बारीक मुलींनी अगदीच काडी दिसू नये, यासाठी कपडे कसे घालावे  किंवा निवडावे, त्याच्या या ५ टिप्स..

 

जाड मुलींनी असे करावे कपड्यांचे सिलेक्शन...१. जाड मुलींनी पांढरे, गुलाबी, आकाशी, पिस्ता अशा हलक्या शेडचे कपडे घालावेत. गडद रंगाचे कपडे घालणं टाळावं. गडद रंगात तब्येत आणखीनच सुदृढ दिसते. २. खूप गजबज किंवा मोठे मोठे प्रिंट असणारे, मोठ्या मोठ्या फुलांचे डिझाईन असणारे कपडे घातल्यानेही आपण आहोत, त्यापेक्षा आणखी जाड दिसतो. त्यामुळे साधारणपणे बारीक प्रिंट असणारे कपडे निवडावेत.३. आडव्या स्ट्रीपचे कपडे किंवा आडवं प्रिंट, आडवे नक्षी असणारे कपडेही जाड मुलींनी टाळावेत. असे कपडे बारीक मुलींना चांगले दिसतील. त्यात त्यांची तब्येतही जरा भरलेली दिसेल. 

 

४. जाडसर मुलींनी खूप जास्त घट्ट किंवा खूपच सैलसर असे दोन्ही प्रकारचे कपडे घालणं टाळावं. त्यांनी व्यवस्थित त्यांच्या फिटिंगनुसारच कपडे निवडावेत. कारण या दोन्ही प्रकारच्या कपड्यांमध्ये त्या अधिक जाड दिसू शकतात.५. कोणतंही प्रिंट नसणारे प्लेन कपडे जर घातले तर त्यात आपली तब्येत निश्चितच जेवढी आहे, त्यापेक्षा कमी दिसते. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सफॅशनमहिला