Lokmat Sakhi >Beauty > तुमच्या केसांसाठी ‘योग्य’ तेल कसे निवडाल? कोणते तेल परफेक्ट, ५ टिप्स

तुमच्या केसांसाठी ‘योग्य’ तेल कसे निवडाल? कोणते तेल परफेक्ट, ५ टिप्स

How To Choose Perfect Hair Oil For Different Hair Type And Hair Problems : वेगवेगळ्या प्रकारच्या केसांना कोणतं तेल योग्य आहे याबाबत समजून घ्यायला हवं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 02:04 PM2023-06-15T14:04:16+5:302023-06-15T17:47:01+5:30

How To Choose Perfect Hair Oil For Different Hair Type And Hair Problems : वेगवेगळ्या प्रकारच्या केसांना कोणतं तेल योग्य आहे याबाबत समजून घ्यायला हवं..

How To Choose Perfect Hair Oil For Different Hair Type And Hair Problems : How to choose oil considering hair type and problem? If you want to reduce hair loss, dandruff… | तुमच्या केसांसाठी ‘योग्य’ तेल कसे निवडाल? कोणते तेल परफेक्ट, ५ टिप्स

तुमच्या केसांसाठी ‘योग्य’ तेल कसे निवडाल? कोणते तेल परफेक्ट, ५ टिप्स

आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांना आवर्जून तेल लावतो. केस मुलायम व्हावेत, केसांचे चांगले पोषण व्हावे यासाठी तेल लावणे महत्त्वाचे समजले जाते. हे तेल लावताना ते मुळांना, हाताच्या बोटांनी हळूवारपणे लावायला हवे, त्यानंतर त्यावर टॉवेल ओला करुन तो बांधून ठेवायला हवा असे काही ना काही सांगितले जाते. याशिवाय आपण केसांचा पोत लक्षात घेऊन शाम्पू आणि कंडीशनरची निवड करतो, त्याचप्रमाणे तेलाचीही निवड करायला हवी. साधारणपणे घरात खोबऱ्याचं किंवा बदामाचं नाहीतर आवळ्याचं एकच तेल आणलं जातं आणि घरातील प्रत्येक जण केसांचा पोत लक्षात न घेता हेच तेल वापरतो (How To Choose Perfect Hair Oil For Different Hair Type And Hair Problems) . 

पण असे करणे योग्य नाही, कारण प्रत्येकाच्या केसाचा प्रकार, केसांशी निगडीत तक्रारी वेगवेगळ्या असू शकतात. म्हणूनच या गोष्टी लक्षात घेऊन त्याप्रमाणे तेलाची निवड व्हायला हवी. काही जणींचे केस खूप कोरडे असतात, काहींचे भुरे असतात. तर काहींचे केस कायमच खूप तेलकट असतात. अनेकांना कोंड्याचा, केस खूप रुक्ष असण्याचा त्रास असतो. त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या केसांना कोणतं तेल योग्य आहे याबाबत आपल्याला माहिती हवी. त्यासाठीच आज आपण कोणत्या प्रकारच्या केसांसाठी कोणतं तेल फायदेशीर असतं हे समजून घेणार आहोत. 

१. खोबरेल तेल

बहुतांश घरांमध्ये पारंपरिक पद्धतीचे खोबरेल तेल केसांसाठी वापरले जाते. साधारणपणे हे तेल सर्व प्रकारच्या केसांसाठी चांगले असते. मात्र खूप कोरड्या आणि रुक्ष झालेल्या केसांसाठी हे तेल सगळ्यात जास्त चांगले असते. केसांचे पोषण होण्यास आणि मॉईश्चर मिळण्यास या तेलाचा चांगला फायदा होतो. 

२. तिळाचं तेल 

केसगळती, त्यामुळे केस खूप पातळ होणे आणि कमी वयातच केस पांढरे होणे या समस्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या सगळ्या समस्यांसाठी तिळाचं तेल अतिशय फायदेशीर ठरतं. हे तेल महाग असलं तरी ते केसांना उत्तम पोषण देत असल्याने तुम्हाला वरील समस्या असतील तर तुम्ही आवर्जून हे तेल वापरायला हवं. 

३. आर्गन ऑईल

आर्गनच्या झाडाला येणाऱ्या बियांपासून हे तेल काढले जाते. जगभरात हे तेल महागड्या तेलांपैकी एक समजले जाते. जर तुमचे केस खूप तेलकट असतील आणि केसांच्या त्वचेत सतत तेलाची निर्मिती होत असेल तर हे तेल तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर असते हे लक्षात घ्या. 

४. एरंडेल तेल

केसांच्या मूळाची जागा खूप कोरडी असेल, केसांची वाढ होत नसेल आणि केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील तर अशांनी एरंडेल तेल वापरायला हवे. आयुर्वेदात एरंडेल तेलाला बरेच महत्त्व असून आरोग्याच्या इतर तक्रारींसाठीही हे तेल आवर्जून वापरले जाते. 

५. ऑलिव्ह ऑईल

अनेकदा आपले केस खूप दाट असतात, पण ते खूप रफ आणि ड्राय असतील तर अशा केसांसाठी ऑलिव्ह ऑईल अतिशय फायदेशीर ठरते. जास्त चिकट आणि घट्टसर असल्याने आपण हे तेल वापरणे टाळतोस मात्र केसांना रफनेस कमी करण्यासाठी हे तेस उपयुक्त ठरते. 

 

 

Web Title: How To Choose Perfect Hair Oil For Different Hair Type And Hair Problems : How to choose oil considering hair type and problem? If you want to reduce hair loss, dandruff…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.