डोळे हा आपल्या शरीरातील एक सर्वात महत्त्वाचा आणि बोलका अवयव असतो. आपण आनंदी असलो, उदास असलो, काळजीत असलो तर आपल्या मनातील भावना आपल्या चेहऱ्यावर आणि विशेषत: डोळ्यात उमटतात. डोळे सुदंर असतील तर आपल्या सौंदर्यात निश्चितच भर पडते. मात्र अनेकदा ताणतणाव, त्वचेच्या तक्रारी, आरोग्याच्या तक्रारी यांमुळे डोळ्यांच्या खाली काळे डाग पडतात. काहीवेळा डोळे इतके खोल जातात की आपण विचित्र दिसायला लागतो. डोळ्यांखाली सुरकुत्या येणे, काळे डाग पडणे अशा तक्रारी तुम्हालाही भेडसावत असतील तर यासाठी क्रिम किंवा सिरम आवर्जून वापरायला हवे. पण कोणत्या समस्येसाठी कोणत्या प्रकारच्या सिरमची किंवा क्रिमची निवड कशी करायची याबाबत आपल्याला माहिती असायला हवी. म्हणजे नेमक्या समस्येवर नेमके उपाय केले जातात. प्रसिद्ध त्वचारोगतजज्ज्ञ डॉ. जयश्री शरद यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देतात त्या कोणत्या आणि कशा फॉलो करायच्या याविषयी (How to choose Perfect Undereye Serum or Cream)...
१. जर तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील, हायपरपिग्मेंटेशन असेल तर तुम्ही आर्बुटिन, लिकोरिस, व्हिटॅमिन सी, कोजिक अॅसिड इ. सारख्या त्वचेला उजळ करणारे कोणतेही घटक वापरु शकता. हे घटक असलेले बरेच क्रिम बाजारात सहज उपलब्ध असतात.
२. तुमच्या डोळ्यांखाली बारीक रेषा असल्यास रेटिनॉल किंवा पेप्टाइड्सची निवड करा. यामुळे रेषा झाकल्या जातात आणि कालांतराने त्या कमी होण्याचीही शक्यता असते.
३. जर तुमचे डोळे खोल गेले असतील तर हायलुरोनिक ऍसिड असलेले सीरम तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. यामुळे डोळे खूप आजारी न दिसता ताजेतवाने दिसतील.
४. बारीक केशिका किंवा शिरांमुळे तुमच्या डोळ्याखाली निळसर झाले असेल तर तुम्ही वापरत असलेल्या सिरममध्ये व्हिटॅमिन के असेल याची खात्री करा. यामुळे हा निळसरपणा नियंत्रणात येण्यास मदत होईल.
५. काहीवेळा तुम्हाला क्यू-स्विच ND-YAD लेसर किंवा पिको लेसर करावे लागेल ज्यामुळे डोळ्याखाली गडद होणे कमी होईल. याशिवाय आर्जिनिन पील किंवा ग्लायकोलिक ऍसिड पील हेही डोळ्याखालचे काळे डाग म्हणजेच डार्क सर्कल कमी करण्याचा सोपा उपाय आहे.