Lokmat Sakhi >Beauty > आपल्या रंगानुसार योग्य लिपस्टिक शेड कशी निवडायची? एक्सपर्ट सांगतात, खास टिप्स-दिवाळीसाठी स्पेशल लिपस्टिक

आपल्या रंगानुसार योग्य लिपस्टिक शेड कशी निवडायची? एक्सपर्ट सांगतात, खास टिप्स-दिवाळीसाठी स्पेशल लिपस्टिक

how to select lipstick shades for your skin type and skin tone : लिपस्टीक खरेदी करताना आपल्याला कोणती शेड चांगली दिसेल हे समजत नाही, अशांसाठी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2024 02:29 PM2024-10-17T14:29:40+5:302024-10-17T14:32:32+5:30

how to select lipstick shades for your skin type and skin tone : लिपस्टीक खरेदी करताना आपल्याला कोणती शेड चांगली दिसेल हे समजत नाही, अशांसाठी..

How to choose the right lipstick shade according to your skin complexion? Experts say, special tips-special lipstick for Diwali | आपल्या रंगानुसार योग्य लिपस्टिक शेड कशी निवडायची? एक्सपर्ट सांगतात, खास टिप्स-दिवाळीसाठी स्पेशल लिपस्टिक

आपल्या रंगानुसार योग्य लिपस्टिक शेड कशी निवडायची? एक्सपर्ट सांगतात, खास टिप्स-दिवाळीसाठी स्पेशल लिपस्टिक

घाईघाईत एखाद्या कार्यक्रमाला, ऑफीसला किंवा अगदी कुठेही घराबाहेर पडताना आपण बाकी काही नाही पण काजळ आणि लिपस्टीक आवर्जून लावतो. आता आपण कोणत्या कार्यक्रमाला जातो, वेळ काय आहे, कपडे कशापद्धतीचे आहेत यावर आपण कोणती लिपस्टीक वापरायची हे ठरवतो. पण आपल्या रंगावर कोणत्या प्रकारची लिपस्टीक चांगली दिसेल हे आपल्याला काही वेळा कळेलच असे नाही. एकाच रंगाची लिपस्टीक वेगवेगळ्या व्यक्तींवर खूप वेगळी दिसते. लिपस्टीक खरेदी करताना मात्र आपल्याला कोणती शेड चांगली दिसेल हे समजत नाही (how to select lipstick shades for your skin type and skin tone). 

आपण हातावर टेस्ट करुनही पाहतो मात्र प्रत्यक्ष घरी आल्यावर ही लिपस्टीक वेगळीच दिसते. दिवाळीच्या निमित्ताने तुम्हीही लिपस्टीक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्या त्वचेच्या रंगानुसार कोणती लिपस्टीक घ्यायची हे समजायला हवं. राष्ट्रीय पातळीवरील मेकअप आर्टीस्ट हितेश डेवेट यासंबंधीच्या काही महत्त्वाच्या टिप्स देतात. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना याबाबत विस्ताराने सांगितले असून खरेदीच्या वेळी या गोष्टी लक्षात ठेवल्यास आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो. 

१. तुमचा रंग गोरा असेल तर नैसर्गिकपणे त्याच्यावर चांगले कॉम्प्लेक्शन येईल अशी शेड घ्यायला हवी. गोऱ्या रंगावर खूप गडद रंगाची लिपस्टीक लावली तर तो मेकअप अंगावर आल्यासारखा दिसतो. अशावेळी न्यूड टोन्सच्या गुलाबी, पिच रंगाच्या लिपस्टीक छान दिसतात. कोरलच्या रंगाच्या किंवा थोड्या ब्राऊन रंगाकडे जाणारे फिकट रंगही अशा व्यक्तींना चांगले दिसतात. मात्र थोडा बोल्ड लूक करायचा असेल तर चेरी रेड, गडद लाल रंग चांगला दिसतो. 

२. तुमचा रंग सावळा किंवा गहूवर्णाकडे झुकणारा असेल तर तुमच्यासाठी बऱ्याच शेडसचे पर्याय उपलब्ध असतात. रोझी पिंक, माव्ह रंग किंवा रिच बेरी प्रकारातले कोणतेही रंग तुमच्यावर चांगले उठून दिसू शकतात. यामुळे तुमच्या चेहऱ्याचा नैसर्गिक टोन खुलून येण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. तुमच्या त्वचेचा रंग जास्त गडद असेल तर मात्र आपल्याला काय चांगलं दिसेल असा प्रश्न सतत तुमच्यासमोर असतो. पण अशा लोकांना थोड्या बोल्ड आणि व्हायब्रंट लिपस्टीक शेडस चांगल्या दिसतात. चॉकलेट ब्राऊन, लाल, फुशिया रंगाच्या लिपस्टीक अशा रंगावर उठून येतात. न्यूड शेडस ट्राय करायच्या असतील तर रीच कॅरॅमल किंवा टॉफी रंग चांगला दिसतो. 

Web Title: How to choose the right lipstick shade according to your skin complexion? Experts say, special tips-special lipstick for Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.