Lokmat Sakhi >Beauty > ब्यूटी ब्लेंडर धुण्याची योग्य पद्धत पाहून घ्या, नुसतंच पाण्याने धुत असाल तर त्वचेचं होईल नुकसान....

ब्यूटी ब्लेंडर धुण्याची योग्य पद्धत पाहून घ्या, नुसतंच पाण्याने धुत असाल तर त्वचेचं होईल नुकसान....

How To Clean Beauty Blender?: ब्यूटी ब्लेंडर अनेकजणी वापरतात. पण ते स्वच्छ कसं करायचं हे मात्र अनेक जणींना माहिती नसतं. म्हणूनच ब्यूटी ब्लेंडर स्वच्छ करण्याची ही योग्य पद्धत एकदा पाहून घ्या...(proper method of cleaning beauty blender)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2023 03:33 PM2023-12-02T15:33:31+5:302023-12-02T15:36:21+5:30

How To Clean Beauty Blender?: ब्यूटी ब्लेंडर अनेकजणी वापरतात. पण ते स्वच्छ कसं करायचं हे मात्र अनेक जणींना माहिती नसतं. म्हणूनच ब्यूटी ब्लेंडर स्वच्छ करण्याची ही योग्य पद्धत एकदा पाहून घ्या...(proper method of cleaning beauty blender)

How to clean beauty blender? proper method of cleaning beauty blender, Cleaning tips for beauty blender | ब्यूटी ब्लेंडर धुण्याची योग्य पद्धत पाहून घ्या, नुसतंच पाण्याने धुत असाल तर त्वचेचं होईल नुकसान....

ब्यूटी ब्लेंडर धुण्याची योग्य पद्धत पाहून घ्या, नुसतंच पाण्याने धुत असाल तर त्वचेचं होईल नुकसान....

Highlightsब्यूटी ब्लेंडरचा वापर करून मेकअपचा बेस चांगला सेट करता येतो. पण नंतर मात्र अनेक जणी ते व्यवस्थित स्वच्छ करत नाही.

मेकअप करण्यासाठी अनेक जणी ब्यूटी ब्लेंडर वापरतात. ब्यूटी ब्लेंडरचा वापर करून मेकअपचा बेस चांगला सेट करता येतो. पण नंतर मात्र अनेक जणी ते व्यवस्थित स्वच्छ करत नाही. साध्या पाण्याने धुतले की ब्लेंडर स्वच्छ होऊन जाते, असा बऱ्याच जणींचा अंदाज असतो. पण प्रत्येक वापरानंतर अशा पद्धतीने धुतले तरी साधारण ३ ते ४ वापरानंतर मात्र ते अस्वच्छ होते. त्यामुळे ते व्यवस्थित धुणं गरजेचं आहे (proper method of cleaning beauty blender). म्हणूनच आता ब्यूटी ब्लेंडर स्वच्छ करण्याची योग्य पद्धत पाहूया (How to clean beauty blender?)...

ब्यूटी ब्लेंडरची स्वच्छता कशी करायची?

 

१. ब्यूटी ब्लेंडरची योग्य पद्धतीने स्वच्छता कशी करायची याविषयीचा व्हिडिओ karishma__makeupartist या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मेकअप आर्टिस्टने याविषयीची संपूर्ण माहिती दिली आहे.

व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता दूर करणारे ५ पदार्थ

२. ब्यूटी ब्लेंडर स्वच्छ करण्यासाठी आपल्याला खोबरेल तेल आणि डिशवॉश लिक्विड लागणार आहे.

३. त्यासाठी सगळ्यात आधी ब्यूटी ब्लेंडरवर साधारण दिड ते २ टेबलस्पून खोबरेल तेल टाका. त्यानंतर ते हाताने व्यवस्थित दाब देऊन देऊन चोळा. यामुळे त्यात अडकलेले सगळे मेकअपचे पार्टिकल्स बाहेर येतील. 

 

४. यानंतर त्यावर डिशवॉश टाका आणि ते पुन्हा एखादा मिनिट हाताने चांगला दाब देऊन चोळा. चोळताना त्यातला मळ बाहेर येईल, अशा पद्धतीने दाब द्यावा.

५. यानंतर त्यावर हळूहळू पाणी ओतावे आणि पाण्याने ते ब्यूटी ब्लेंडर आणखी स्वच्छ करावे.

रणबीर कपूर म्हणाला "आई झाल्यानंतर महिलांनी काम करणं म्हणजे....", त्याच्या याच ॲटिट्यूटमुळे आज आलिया...

६. यानंतर उन्हामध्ये ठेवून चांगले स्वच्छ वाळवावे.

७. अशा पद्धतीने नियमितपणे ब्यूटी ब्लेंडरची स्वच्छता करावी. साधारण ६ ते ८ महिन्याने ब्यूटी ब्लेंडर बदलून टाकावे. 

 

Web Title: How to clean beauty blender? proper method of cleaning beauty blender, Cleaning tips for beauty blender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.