आपल्या शरीराचे काही भाग असे असतात जे रोजच्या रोज आंघोळ करून स्वच्छ होत नाहीत. त्यांच्यासाठी थोडा अधिकचा वेळ काढूनच त्यांची स्वच्छता करावी लागते. उदाहरणार्थ हाताचे कोपरे, पायाचे घोटे, गुडघे, मान, गळा हे भाग खूप काळवंडून जातात. त्यांच्या स्वच्छतेकडे जर दुर्लक्ष झालं तर ते अधिकच काळे पडत जातात आणि मग स्वच्छ करणं कठीण होऊन जातं. लहान मुलांचे गुडघे, पायाचे घोटे, हाताचे काेपरे तर जरा जास्तच काळे पडतात. कारण बिंधास्तपणे खेळताना ते कुठेही मस्त करत असतात (home remedies to clean dark dry elbows). म्हणूनच त्यांच्या हाताच्या कोपऱ्यांची स्वच्छता करण्यासाठी या काही टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगी येऊ शकतात.(how to clean blackness or tanning on children's elbow?)
लहान मुलांचे काळवंडलेले हाताचे कोपरे कसे स्वच्छ करावे?
१. बटाट्याचा रस आणि लिंबू
बटाटा, लिंबू हे नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्वचेवरचं टॅनिंग कमी करण्यासाठी ते खूप उपयुक्त ठरतात. बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन एकत्र करा.
गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीच्या जोडीला हवीच बटाट्याची खमंग भाजी! ५ टिप्स- भाजी होईल जास्त चवदार
हे मिश्रण हाताच्या कोपऱ्यावर लावा आणि ५ मिनिटांनी लिंबाच्या साली त्यावर चोळा. यानंतर हात स्वच्छ धुवून टाका. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करा.
२. बेसन आणि मध
एका वाटीमध्ये दोन चमचे बेसन घ्या. त्यामध्ये १ चमचा दही आणि १ चमचा मध घाला. सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्या. हा लेप हाताच्या कोपऱ्यावर ६ ते ८ मिनिटे लावून ठेवा.
गुढीपाडवा : शोभायात्रेला नटून जायचंय, पण पिंपल्सचं टेंशन? 'हा' घरगुती उपाय- टॅनिंग -पिंपल्स गायब
यानंतर लेप सुकू लागला की त्याठिकाणी थोडं जोर देऊन चोळा. लेप जसा निघून येईल, तसंच त्वचेवरचं टॅनिंगही निघून जाईल. हा उपायही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता. लहान मुलांप्रमाणेच मोठ्या व्यक्तींच्या अंगावरचं टॅनिंग कमी करण्यासाठीही हे उपाय उपयुक्त ठरतात.