बदलत्या वातावरणात त्वचेतही बदल झालेला दिसून येतो. (Winter Skin Care Tips) खासकरून हिवाळ्याच्या दिवसांत जेव्हा त्वचेची व्यवस्थित काळजी जात नाही तेव्हा अधिक समस्या जाणवते. वेगेवगळ्या त्वचेच्या समस्याही उद्भवतात.(Winter Beauty Tips By Shahnaz Husain) अशावेळी चेहऱ्याचा रंग डल पडू लागतो आणि त्वचा ड्राय होते. अशावेळी स्किन टाईपनुसार त्वचेची काळजी घेणं महत्वाचे असते. हिवाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्यातही बदल करायला हवेत. स्किन केअर रूटीनमध्ये बदल न केल्यास वेळेआधीच सुरकुत्या येऊ शकतात. (How to Clean Face in Winter By Shahnaz Husain)
ड्रायस्किनची काळजी कशी घ्यावी? (How to Take Care of Dry Skin)
त्वचा हिवाळ्याच्या दिवसांत जास्त कोरडी पडते इतकंच नाही तर त्वचेवर पॅचेससुद्धा येतात. ड्रासनेसमुळे लाल पॅचेस येतात. अशा स्थितीत त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज असते. अन्यथा त्वचेवर एजिंग इफेक्ट्स दिसून येतात. म्हणून स्किन केअर रूटीन फॉलो करा.
केस खूपच पांढरे झाले? चहा पावडरमध्ये 'हा' पदार्थ घालून केसांना लावा, मुळापासून काळे होतील केस
चेहऱ्याला मॉईश्चराईज ठेवण्यासाठी टोनिंग गरजेचं असतं. यासाठी तुम्ही कच्च दूध, एलोवेरा जेल, मध इत्यादींचा वापर करू शकता. यात फक्त फॅटी एसिड्स नसतात तर दूधात त्वचेला ब्लीच करण्याची क्षमता असते. यामुळे त्वचेला डिप मॉईश्चराईज मिळते.
तेलकट त्वचेची काळजी कशी कराल (How to Take Care of Oily Skin)हिवाळ्यात ऑयली स्किनची अधिक काळजी घ्यावी लागते. चेहरा स्वच्छ ठेवण्यात थोडा जरी निष्काळजीपणा दाखवला तर या चुकीचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच ऑयली स्किन असलेल्यांनी योग्य स्किन केअर रुटीनचा अवलंब करावा. कडुलिंब आणि तुळशीच्या पानांचे टोनर तयार करा. मूठभर तुळस आणि कडुलिंबाची पानं घ्या आणि उकळत्या पाण्यात घाला. त्यानंतर पाणी थंड करा मग एका स्प्रे बॉटलमध्ये भरा.
केस पिकलेत-डाय, मेहेंदीची सवय नाही? 'या' पानांचा घरगुती डाय लावा, काळभोर होतील केस
सकाळी उठल्यानंतर तुम्ही चेहरा स्किन करण्यासाठी याचा वापर करू शकता. तुळशी आणि कडुलिंब यात एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी फंगल गुण असात. त्यामुळे त्वचेच्या संक्रमणापासून बचाव होतो. हे टोनर दोन वेळा चेहऱ्याला लावल्याने चेहरा क्लिन राहण्यास मदत होते.
चेहऱ्याला तुम्ही गुलाब पाणी आणि चंदन मिसळून लावू शकता.यामुळे चेहऱ्यावर डेड सेल्स निघून जाण्यास मदत होते. तेलकट स्किन असलेल्यांचे पोर्स मोठे असतात त्यातील घाण काढून टाकण्यासाठी तुम्ही कडुंलिंबाची पानांचा वापर करू शकता. फेशियल स्टिमनंतर चेहऱ्याला एलोवेरा जेल लावू शकता. थेट एलोवेरा जेल अप्लाय करण्यापेक्षा नारळाच्या तेलाबरोबर मिसळून लावू शकता.
कॉम्बिनेशन स्किनची कशी काळजी घ्यावी (How to Take Care of Combination Skin)
कॉम्बिनेशन स्किन असलेल्यांची स्किन ड्राय असते कधी कोरडी असते. अशावेळी योग्य स्किन केअर रूटीन फॉलो करण्याची गरज असते. जसं की गुलाब पाण्याने चेहऱ्याचे टोनिंग करा. गुलाब पाण्याने टोनिंग केल्याने स्किन क्लिन होण्याबरोबच मॉईश्चराईज होईल. कारण गुलाबपाण्यात नॅच्युरल मॉईश्चरायजिंग प्रॉपर्टीज असतात. बेसन आणि दूधाचा फेस पॅकही चेहऱ्याला लावू शकता. १५ ते २० मिनिटांनी चेहऱ्याला व्यवस्थित स्क्रब करा. हे स्किन केअर रूटीन फॉलो केल्याने त्वचा चमकदार दिसेल आणि गंभीर समस्याही उद्भभवणार नाहीत.