Join us  

पायाला भेगा पडल्या, ‌ पाऊलं खूप काळी पडली? १ सोपा उपाय; पाय दिसतील स्वच्छ-होतील मुलायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2023 10:18 AM

How To Clean Feet With Natural Ingredients : घरच्या घरी होणारा सोपा उपाय एकदा करुन तर पाहा...

चेहरा हा शरीराचा सर्वात आधी पाहिला जाणारा भाग असल्याने आपण नेहमी चेहऱ्याच्या सौंदर्याकडे लक्ष देतो. चेहऱ्यावर डाग, फोड नकोत म्हणून चेहऱ्याला मेकअपही करतो. पण त्या तुलनेत आपण हात, पाय यांच्याकडे लक्ष देतोच असं नाही. मात्र सौंदर्य आणि स्वच्छतेच्या बाबतीत हे अवयवही महत्त्वाचे असून त्यांच्याकडेही पुरेसे लक्ष द्यायला हवे. थंडीच्या दिवसांत तर पायाची त्वचा कोरडी पडते, तळपायाला भेगा पडतात. बरेचदा यामध्ये धूळ, पाणी गेल्याने पाय काळे होतात. फारतर आपण हे पाय स्वच्छ धुतो किंवा कधीतरी घासतो. अगदीच एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल तर कधीतरी पेडीक्युअर करतो. पण त्यापलिकडे आपण आपल्या पायांकडे पुरेसं लक्ष देत नाही. पण काही किमान उपाय केल्यास आपले पाय स्वच्छ आणि गोरे दिसतात. इतकंच नाही तर त्यांची त्वचाही मुलायम होण्यास मदत होते. आता यासाठी नेमका काय आणि कोणता उपाय करायचा ते पाहूया (How To Clean Feet With Natural Ingredients)...

१. पहिल्यांदा बादली किंवा टबात कोमट पाणी घ्या. यामध्ये किमान १५ ते २० मिनीटांसाठी पाय बुडवून ठेवा. पाण्यात ठेवल्याने पायाची त्वचा काही प्रमाणात मुलायम होण्यास मदत होईल त्यानंतर प्युमिक दगडाने पायाची मृत त्वचा घासून काढा. 

(Image : Google)

२. पाय स्वच्छ करण्यासाठी आपण दुधाचा वापर करु शकतो. दूध हे नैसर्गिक क्लिंजरप्रमाणे काम करत असल्याने पाय स्वच्छ करण्यास ते फायदेशीर असते. एका पॅनमध्ये अर्धी वाटी दूध घ्या, त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि २ थेंब लिंबाचा रस घाला. फुट मास्क म्हणून हे मिश्रण अतिशय उत्तम काम करते. १० ते १५ मिनीटे ही पेस्ट पायांना सगळीकडून लावून ठेवा.

३. आता एखादा सॉफ्ट ब्रश घेऊन त्याने पाय स्वच्छ घाला आणि कोमट पाण्याने धुवा. यामुळे पायाच्या भेगांमध्ये अडकलेली घाण निघून जाण्यास मदत होईल. तसेच पाय स्वच्छ आणि मुलायम दिसतील. 

४. यानंतर सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे न विसरता पायांना मॉईश्चराइज करा. त्यामुळे पायांचा ओलावा टिकून राहण्यास मदत होईल आणि कोरडेपणा कमी होईल. 

(Image : Google)

५. लिंबामुळे पायाला असलेले बॅक्टेरीया मरुन जाण्यास मदत होईल. तसेच दूधामध्ये मॉईश्चरायजिंग घटक असल्याने पायांना मुलायमपणा येण्यास त्याचा चांगला उपयोग होईल. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास पाय स्वच्छ राहण्यास मदत होईल 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी