आपण सर्वजण केस विंचरतो. प्रत्येकजण दिवसातून १-२ वेळा केस विंचरतो.त्यामुळे केस आणखी सुंदर दिसतात. पण जर तुमचा कंगवा स्वच्छ नसेल तर त्यामुळे तुमचे केस खराब होऊ शकतात. म्हणून, वेळोवेळी तुमचा कंगवा स्वच्छ करत राहणं महत्वाचं आहे. पण काही लोक कंगवा स्वच्छ करत नाहीत ज्यामुळे तो आणखी घाण होतो. तसेच यामुळे इन्फेक्शनचा धोका निर्माण होऊ शकतो. कंगवा स्वच्छ करण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया, ज्यामुळे कंगवा काही मिनिटांतच नव्यासारखा होईल.
कंगवा स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
शॅम्पू वापरा
कंगवा स्वच्छ करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे शॅम्पू घेऊन तो पाण्यात मिक्स करा. आता कंगवा थोडा वेळ शॅम्पूमध्ये भिजवा आणि नंतर टूथब्रशच्या मदतीने कंगवा स्वच्छ करा. कंगव्याच्या दातांमध्ये अडकलेली घाण सहज निघून जाईल.
बेकिंग सोड्याने स्वच्छ करा
काही मिनिटांत कंगवा चमकवण्यासाठी बेकिंग सोडा वापरा. यासाठी गरम पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा घाला. त्यात थोडी डिटर्जंट पावडर घाला आणि कंगवा बुडवा. आता तो घासून ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा. साचलेली सर्व घाण सहज बाहेर येईल.
साबणाने स्वच्छ करा
जर तुमच्याकडे वेळ कमी असेल, तर फक्त कंगवा पाण्यात भिजवा आणि नंतर कोणत्याही साबणाने किंवा लिक्विड हँडवॉशच्या मदतीने कंगवा स्वच्छ करा. ब्रशच्या मदतीने, अडकलेली सर्व घाण सहजपणे काढून टाकली जाईल.
करू नका ही चूक
बऱ्याच वेळा लोक कंगवा स्वच्छ करण्यासाठी आणि त्यातील घाण काढण्यासाठी सुई किंवा पिन वापरतात, जी चुकीची पद्धत आहे. यामुळे कंगव्यात अडकलेली घाण साफ होऊ शकते, परंतु तेलकटपणा आणि इतर घाण काढणं कठीण होतं. यामुळे कंगवा देखील खराब होऊ शकतो. आपला कंगवा इतरांना वापरण्यासाठी देऊ नका. तसेच दुसऱ्यांच्या कंगवाने आपले केस विंचरू नका.