Lokmat Sakhi >Beauty > मेकअपचे ब्रश स्वच्छ करण्यासाठी वापरा घरगुती ४ पदार्थ, ब्रश राहतील मऊ- महागड्या क्लिनरची गरज नाही...

मेकअपचे ब्रश स्वच्छ करण्यासाठी वापरा घरगुती ४ पदार्थ, ब्रश राहतील मऊ- महागड्या क्लिनरची गरज नाही...

How To Clean Makeup Brushes With Homemade Cleaner Know 4 Tricks : 4 DIY Makeup Brush Cleaning Hacks : The Best Ways to Clean Makeup Brushes At Home : घरच्याघरीच नैसर्गिक पदार्थांपासून पटकन तयार करा कमी खर्चात होणारे मेकअप ब्रश क्लिनर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2024 06:10 PM2024-11-20T18:10:27+5:302024-11-20T18:22:31+5:30

How To Clean Makeup Brushes With Homemade Cleaner Know 4 Tricks : 4 DIY Makeup Brush Cleaning Hacks : The Best Ways to Clean Makeup Brushes At Home : घरच्याघरीच नैसर्गिक पदार्थांपासून पटकन तयार करा कमी खर्चात होणारे मेकअप ब्रश क्लिनर...

How To Clean Makeup Brushes With Homemade Cleaner Know 4 Tricks 4 DIY Makeup Brush Cleaning Hacks | मेकअपचे ब्रश स्वच्छ करण्यासाठी वापरा घरगुती ४ पदार्थ, ब्रश राहतील मऊ- महागड्या क्लिनरची गरज नाही...

मेकअपचे ब्रश स्वच्छ करण्यासाठी वापरा घरगुती ४ पदार्थ, ब्रश राहतील मऊ- महागड्या क्लिनरची गरज नाही...

प्रत्येकीला मेकअप करायला फार आवडत. सुंदर शोभेल असा मेकअप करण्यासाठी आपल्याला परफेक्ट मेकअप टूल्सची गरज असते. मेकअप किटमधील सर्वात महत्वाच्या टूल्सपैकी एक म्हणजे मेकअप ब्रश. मेकअप ब्रश वापरुन आपण सुंदर, फ्लॉलेस मेकअप अगदी सहज आणि झटपट करु शकतो. मेकअप करताना मेकअप ब्रश वापरणे जितके महत्वाचे असते, तितकेच मेकअप ब्रशची स्वच्छता ठेवणे देखील गरजेचे असते. मेकअप करण्यासाठी वापरलेले मेकअप ब्रश वेळीच स्वच्छ करणे आवश्यक असते, नाहीतर आपल्या त्वचेवर त्याचे गंभीर आणि वाईट परिणाम दिसू शकतात(How to Clean Makeup Brushes Naturally At Home).

 आपल्या मेकअप किटमध्ये बरेच ब्रश असतात परंतु काहीवेळा यांची योग्य ती स्वच्छता केलेली नसते. सतत वापरुन मेकअप ब्रश स्वच्छ न करता असेच ठेवले तर ब्रश देखील खराब होतात. अशावेळी हे ब्रश दिर्घकाळ न टिकता लगेच खराब होतात. यासाठीच मेकअप ब्रशच्या स्वच्छतेची योग्य ती काळजी घ्यावी. मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी आपण बाजारांतून मेकअप ब्रश क्लिनर विकत घेतो खरे, परंतु हे क्लिनर फारच महाग असतात. असे क्लिनर प्रत्येकवेळी वापरणे शक्य होईलच असे नाही. यासाठीच आपण घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक पदार्थांपासून पटकन कमी खर्चात तयार होणारे मेकअप ब्रश क्लिनर वापरु शकतो. घरगुती मेकअप ब्रश क्लिनर तयार करण्यासाठी नेमकं काय करावं ते पाहूयात(How To Clean Makeup Brushes With Homemade Cleaner Know 4 Tricks).  

घरगुती मेकअप ब्रश क्लिनर... 

१. बेकिंग सोडा आणि गरम पाणी :- बेकिंग सोडा आणि गरम पाणी एकत्रित मिसळून तुम्ही मेकअप ब्रशसाठी क्लिनर बनवू शकता. खरंतर, बेकिंग सोडा ब्रशच्या ब्रिस्टल्समधील घाण आणि अडकून बसलेले मेकअप प्रॉडक्ट्स पूर्णपणे स्वच्छ करण्यास मदत करतो. मेकअप ब्रश क्लिनर बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये एक टेबलस्पून बेकिंग सोडा घेऊन तो पाण्यांत मिसळून त्याची एकत्रित पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट ब्रशच्या ब्रिस्टल्सवर घासून स्वच्छ होईपर्यंत हलकेच बोटांच्या मदतीने चोळून घ्या. मग स्वच्छ पाण्याने ब्रश धुवून घ्यावेत. 

चहा-कॉफी पिताना कपवर लिपस्टिकचे डाग पडू नयेत म्हणून खास ट्रिक- लिपस्टिकही पुसली जाणार नाही...

२. व्हाईट व्हिनेगर आणि पाणी :- व्हाईट व्हिनेगर नॅचरल जंतुनाशक म्हणून काम करतो. व्हाईट व्हिनेगर वापरुन आपण ब्रशमधील अडकून बसलेले मेकअप प्रॉडक्ट्स किंवा तेल अगदी सहजपणे काढू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये व्हाईट व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात मिसळून घ्या. या मिश्रणात ब्रश बुडवून १० ते १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने ब्रश धुवून घ्यावेत. 

३. नारळाचे दूध आणि डिश वॉश लिक्विड सोपं :- मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी आपण नारळाचे दूध आणि डिश वॉश लिक्विड सोपं वापरुन देखील घरगुती क्लिनर तयार करु शकता. यासाठी एका बाऊलमध्ये प्रत्येकी एक टेबलस्पून नारळाचे दूध आणि डिश वॉश लिक्विड सोपं मिक्स करा. आता या द्रावणात ब्रश १० ते १५ मिनिटे बुडवून ठेवा. त्यानंतर गरम पाण्याने ब्रश स्वच्छ धुवून घ्यावेत. नारळाच्या दुधात भरपूर आवश्यक जीवनसत्त्वे आणि फॅटी अ‍ॅसिड असते जे ब्रशला हायड्रेट आणि कंडिशन करते. तर डिश वॉश लिक्विड सोपं मेकअप ब्रशमधील घाण काढून टाकण्यास मदत करते.  

हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावून देखील त्वचा कोरडी पडते? ‘या’ ३ चुका तुम्ही हमखास करताय...

४. टी ट्री ऑईल आणि बेबी शाम्पू :- टी ट्री ऑइल आणि बेबी शाम्पूच्या मदतीने आपण सौम्य मेकअप ब्रश क्लिनर घरच्याघरी बनवू शकता. टी ट्री ऑइलमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म ब्रशमधील बॅक्टेरिया साफ करतात आणि बेबी शॅम्पू ब्रशचे केस मऊ , मुलायम बनवतात. मेकअप ब्रश क्लिनर बनवण्यासाठी, एक टेबलस्पून बेबी शाम्पूमध्ये टी ट्री ऑइलचे ३ ते ४ थेंब आणि कोमट पाणी घाला आणि ते मिसळा. आता या मिश्रणात ब्रश १० ते १५ मिनिटे  बुडवून ठेवा आणि मग पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

Web Title: How To Clean Makeup Brushes With Homemade Cleaner Know 4 Tricks 4 DIY Makeup Brush Cleaning Hacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.