Lokmat Sakhi >Beauty > How to Clean Nails Properly : नखांमध्ये घाण अडकल्यानं काळपट मळलेले दिसतात; 5 सोप्या टिप्स, नखं नेहमी दिसतील स्वच्छ

How to Clean Nails Properly : नखांमध्ये घाण अडकल्यानं काळपट मळलेले दिसतात; 5 सोप्या टिप्स, नखं नेहमी दिसतील स्वच्छ

How to Clean Nails Properly : नखांना मॉइश्चरायझ करणे फार महत्वाचे आहे. जर तुम्ही असे केले नाही तर हळूहळू ते तुटायला लागतील आणि कोरडेपणामुळे त्यांची चमक देखील निघून जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 05:59 PM2022-03-20T17:59:10+5:302022-03-20T18:14:19+5:30

How to Clean Nails Properly : नखांना मॉइश्चरायझ करणे फार महत्वाचे आहे. जर तुम्ही असे केले नाही तर हळूहळू ते तुटायला लागतील आणि कोरडेपणामुळे त्यांची चमक देखील निघून जाईल.

How to Clean Nails Properly : Easy nail cleaning tips | How to Clean Nails Properly : नखांमध्ये घाण अडकल्यानं काळपट मळलेले दिसतात; 5 सोप्या टिप्स, नखं नेहमी दिसतील स्वच्छ

How to Clean Nails Properly : नखांमध्ये घाण अडकल्यानं काळपट मळलेले दिसतात; 5 सोप्या टिप्स, नखं नेहमी दिसतील स्वच्छ

सुंदर, टोकदार नखं सगळ्यांनाच आवडतात. अनेकजण आपली नखं वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. पण कधी रोजची कामं करताना नखं तुटतात तर कधी त्यात घाण अडकल्यानं काळपट दिसतात. नखांच्या टोकांवर घाण साचल्यानं कापण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. तर काहीजण अशीच नखं ठेवून वावरतात. (Easy nail cleaning tips) ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा धोका असतो. या लेखात तुम्हाला नखं स्वच्छ, सुंदर ठेवण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत. (How to Clean Nails Properly)

तेलानं नखं स्वच्छ करा

आता तुम्ही विचार करत असाल की ते तेलाने नखं कशी साफ करता येतील. नखांना योग्यरित्या मॉइश्चरायझ करणे फार महत्वाचे आहे. तेलाने मसाज केल्याने त्यांची नैसर्गिक चमक परत येईल. कोणतीही घाण नखांमध्ये अडकली असेल जी सामान्यपणे काढता येत नाही, तर ती तेलाच्या मदतीने सहज करता येते.ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल, व्हिटॅमिन ई तेल इत्यादी खूप उपयुक्त ठरू शकतात. कमीत कमी ५ मिनिटे नखांना तेलाने मसाज करा. हे दोन्ही हात आणि पायांना मालिश करण्यासाठी उत्तम आहे.

गरम पाणी

नखं स्वच्छ करण्याचा दुसरा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कोमट पाण्यात नखे भिजवणे. तुम्ही हे फक्त 5 मिनिटांसाठी करा आणि तुम्ही या पाण्यात व्हिटॅमिन-ई तेल देखील घालू शकता. याशिवाय कोमट पाण्यात शॅम्पू, गुलाबपाणी, थोडं रॉक सॉल्ट वगैरे टाकू शकता जेणेकरून तुमच्या नखांची घाण व्यवस्थित साफ होईल. ही युक्ती हात आणि पाय दोन्हींसाठी काम करेल.

नखांचे क्यूटिकल्सचे नेहमी साफ ठेवा

जर तुम्ही नखांचे क्यूटिकल्स वेळेवर कापले नाही तर ते जास्त खराब होत जातात.  नखांची काळजी घेताना क्यूटिकल्सची साफसफाई करण खूप गरजेचं असतं. यामुळे इन्फेक्शन होत नाही आणि नखांना एक वेगळा सुंदर लूक येतो. 

लिंबाचा रस

सायट्रिक ऍसिड नखांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. जर आपण लिंबाच्या रसाबद्दल बोललो तर नखं स्वच्छ करण्याचा हा एक उत्तम मार्ग असू शकतो. लिंबू कापून त्याच्या रसाने नखे स्वच्छ करू शकता. नुसती लिंबाची साल देखील नखांवर चोळता येते. जर तुम्ही अनेक दिवस तुमची नखे स्वच्छ केली नसतील तर ही एक चांगली पद्धत वापरून पाहा.

कितीही साफ केलं तरी टाईल्सवरचे पिवळे डाग निघत नाहीत? 5 उपाय, घर होईल स्वच्छ, चकचकीत

मॉईश्चरायजरचा वापर

नखांना मॉइश्चरायझ करणे फार महत्वाचे आहे. जर तुम्ही असे केले नाही तर हळूहळू ते तुटायला लागतील आणि कोरडेपणामुळे त्यांची चमक देखील निघून जाईल. यासाठी तुम्ही व्हिटॅमिन-ई असलेली कोणतीही क्रीम किंवा तेल घेऊ शकता. प्रत्येक वेळी हात धुता तेव्हा तुमची नखं पूर्णपणे कोरडी करा आणि नंतर मॉइश्चरायझ करा.
 

Web Title: How to Clean Nails Properly : Easy nail cleaning tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.