नाकावर जमा झालेले दाणे चेहऱ्याचे सौंदर्य कमी करू शकतात. (Whiteheads Removal Tips) लोकांना त्यांच्या नाकावर ब्लॅकहेड्स जमा झालेले अजिबात आवडत नाहीत. जर हे दाणे हाताने दाबून काढले तर त्यावर डाग तसेच राहतात आणि नाकावर निशाण पडतात. (Beauty Tips) अशा स्थितीत काही घरगुती उपाय करून तुम्ही नाकावरचे एक्ने, व्हाईटहेड्स-ब्लॅकहेड्स काढून टाकू शकता. (Best Home Remedies For Whiteheads) रेग्युलर याचा वापर केल्याने स्किन आणि पोर्स साफ होण्यास मदत होते. (How To Clean Nose Blackheads Naturally)
मेडिकल न्युज टु डे च्या रिपोर्टनुसार व्हाईटडेह्स येण्याची अनेक कारणं आहेत. उच्च ग्लायसेमिक नंबर, हॉर्मोन्स, डेअरी प्रोडक्टस्, तेलयुक्त कॉस्मेटीक्सचा वापर, तेलाने फेशियल मसाज, ताण-तणाव येणं. व्हाईटहेड्स काढून टाकण्यासाठी तुम्ही मध, टि ट्री ऑईल, एलोवेरा, लेमन ज्यूसचा वापर करू शकता.
घरात अन्नकण दिसले की माश्यांचा सुळसुळाट होतो? ५ गोष्टी घरात ठेवा, १ मिनिटांत माश्या गायब
नाकावरचे पोर्स कसे काढून टाकायचे (How to Clean Nose Pore Naturally)
मीठ
नाकावर जमा झालेले पिंपल्स, एक्ने दूर करण्याासाठी तुम्ही मीठाचा वापर करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्ही मीठ घ्या आणि त्यात थोडं एलोवेरा जेल मिसळा. नंतर हे स्क्रब आपल्या नाकाला लावून साफ करा. साफ करताना हलक्या हाताचा वापर करा. या पोर्समुळे घाणं, ब्लॅकहेड्स, व्हाईडहेड्स निघून जाण्यास मदत होईल.
कॉफीने स्क्रब करा
नाकावरचे पोर्स साफ करण्यासाठी कॉफी स्क्रबचा वापर तुम्ही करू शकता. यासाठी कॉफीमध्ये सैंधव मीठ मिसळा. मीठाचे दाणे मोठेच असतील याची काळजी घ्या. त्यानंतर नाकावर स्क्रब करा. थोडावेळ हलक्या हाताने नाकावर रब करून थंड पाण्याने नाक साफ करा. ज्यामुळे नाकाची स्किन चमकदार दिसेल.
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्याने व्हाईटहेड्स काढणं खूपच सोपं होतं. यामुळे पोर्स स्वच्छ होतात. याशिवाय पोर्समध्ये जमा होणारी घाण कमी होते. यामुळे नाकाची स्किन स्वच्छ राहते. एक्ने होत नाहीत. या पदार्थांचा वापर करून तुम्ही नाकाच्या पोर्सची स्वच्छता करू शकता.