सकाळी घाईघाईत आंघोळ करताना अनेकदा नीट हायजिन राखणे अनेकांना जमत नाही. त्यातलाच एक प्रकार म्हणजे नाभी किंवा बेंबी. तिथं अनेकदा घाण साचलेली असते. नाभी हा पोटाचा नाजूक भाग आहे. तिथंही स्वच्छता नीट राखणे अत्यंत गरजेचे आहे(How to Clean Your Belly Button and Prevent Infection).
नाभी साफ करणे का गरजेचं आहे?
शरीरातील इतर अवयवांना ज्याप्रमाणे साफ ठेवतो, त्याचप्रमाणे नाभी देखील स्वच्छ करणे गरजेचं आहे. असे न केल्याने नाभीमध्ये बॅक्टेरिया किंवा इन्फेक्शन होऊ शकते. आपण जेव्हा नाभी स्वच्छ करत नाही, तेव्हा साबण, पाणी आणि कपड्यांतील घाणीमुळे त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे नाभीतून दुर्गंधीही येऊ लागते.
कापसाने हलक्या हाताने पुसा
नाभी हा शरीराचा एक संवेदनशील भाग आहे, त्यामुळे त्याची साफसफाई करताना काळजी घेणे आवश्यक आहे. नाभी स्वच्छ करण्यासाठी, एक कापसाचा गोळा घ्या, तो कोमट पाण्यात भिजवा. कोमट पाणी नाभीतील घाण सहज बाहेर काढते. हा उपाय आठवड्यातून एकदा नक्की करा.
मुलतानी मातीने साफ करा नाभी
मुलतानी मातीचा वापर चेहऱ्यासाठी केला जातो. यासह नाभी साफ करण्यासाठी देखील करू शकता. यासाठी मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी आणि लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण नाभीवर व नाभीच्या आत लावा, थोडावेळ राहू द्या, यानंतर नाभी स्वच्छ पाण्याने धुवा.
उन्हाळ्यात डोक्याला फार घाम येतो, केस चिपचिपे होतात, दुर्गंधीही येते? ४ घरगुती उपाय, चिकचिक कमी
मिठाचा उपाय
कोमट पाण्यात मीठ मिसळा. मिठात अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, जे बॅक्टेरियाशी लढण्यासाठी प्रभावी आहेत. कापडाच्या मदतीने मिठाचे पाणी नाभीवर लावा. कोमट पाण्याने नाभी स्वच्छ केल्याने नाभीमध्ये असलेले बॅक्टेरिया आणि जंतू सहज नष्ट होतात.
कोरफड लावा
कोरफड जेलने आपण नाभी सहज स्वच्छ करू शकता. कोरफडीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. जे नाभी स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर आहेत. यासाठी कोरफडीचे ताजे जेल नाभीवर लावा व काही वेळाने धुवा. नाभीचा काळेपणाही दूर होईल.
काकडीचे ४ फेसपॅक उन्हाळ्यात चेहरा ठेवतील चमकदार आणि कायम फ्रेश, पाहा झटपट जादू
खोबरेल तेल
खोबरेल तेल त्वचा व केसांसाठी खूप फायदेशीर आहे. खोबरेल तेल नाभीमध्ये ओलावा टिकवून ठेवते. कापसाने खोबरेल तेलात बुडवून नाभीवर लावा. याने नाभी स्वच्छ होईल.