Lokmat Sakhi >Beauty > केसांना बरगंडी कलर करायचाय? महागडे पार्लर कशाला, १० रुपयांत घरच्याघरी मिळवा नवा कलर

केसांना बरगंडी कलर करायचाय? महागडे पार्लर कशाला, १० रुपयांत घरच्याघरी मिळवा नवा कलर

How to Color Black Hair Burgundy using Beetroot : बीटाचा वापर जेवणाबरोबरच, सौंदर्य उत्पादनातही  केला जातो. केसांना लाल रंग देण्यासाठी बीट फायदेशीर ठरतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 11:46 AM2023-09-08T11:46:00+5:302023-09-08T13:39:03+5:30

How to Color Black Hair Burgundy using Beetroot : बीटाचा वापर जेवणाबरोबरच, सौंदर्य उत्पादनातही  केला जातो. केसांना लाल रंग देण्यासाठी बीट फायदेशीर ठरतं.

How to Color Black Hair Burgundy using Beetroot : How to color naturally at home | केसांना बरगंडी कलर करायचाय? महागडे पार्लर कशाला, १० रुपयांत घरच्याघरी मिळवा नवा कलर

केसांना बरगंडी कलर करायचाय? महागडे पार्लर कशाला, १० रुपयांत घरच्याघरी मिळवा नवा कलर

आजकाल प्रत्येकालाच केस कलर करण्याची इच्छा असते. खासकरून बर्गंडी  रंग. हा हेअर कलर इव्हरग्रीन आहे. बरगंडी लाल रंगासाठी अनेक हेअर कलर आणि हेअर डाय बाजारात उपलब्ध आहेत. जेव्हा केस पांढरे होऊ लागतात तेव्हा लोक केसांवर मेंहेदीचा वापर करून केसांना लाल बनवतात. (How to color naturally at home) पण हळूहळू मेहेंदीचा रंग फेड होऊ लागतो. तर काहीजण केमिकल्सयुक्त रंगाचा वापर करतात. ज्यामुळे केसांवर चांगला रंग येतो पण केसाना नुकसान पोहोचतं. अशावेळी तुम्ही केसांना नैसर्गिक पद्धतीनं कलर करू शकता. बीटाचा वापर जेवणाबरोबरच, सौंदर्य उत्पादनातही  केला जातो. केसांना लाल रंग देण्यासाठी बीट फायदेशीर ठरतं. ३ प्रकारे बीट तुम्ही केसांना लावू शकता.  (How Do I Dye My Hair Burgundy With Beetroot)

मोहोरीच्या तेलात बीट मिसळून लावा

ऑलिव्ह ऑईलमध्ये बीटाचा रस आणि आलं  किसून घाला आणि नंतर ही पेस्ट आपल्या केसांना लावा. २ ते ३ तासांनी केस धुवा. हा उपाय केल्याने केस नैसर्गिकरित्या काळे झालेले दिसतील. ही पेस्ट बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये बीटाचा रस, किसलेलं आलं , २ ते ३ चमचे  तेल घाला. ही पेस्ट केसांना लावून ३ ते ४ तासांनी शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा ही पेस्ट वापरा. यामुळे केस लाल दिसून येतील.

चेहऱ्यावर तेज नाही, डल-उदास-निस्तेज दिसतोय चेहरा? ४ सोपे उपाय, आठवड्यातभरात येईल चेहऱ्यावर चमक

मेहेंदीत बीट मिसळा

मेहेंदीत बिटाचा रस मिसळून केसांना लावल्याने केसांचा रंग सुधारतो. हा उपाय करण्यासाठी मेहेंदीत बीटाचा रस मिसळा त्यानंतर त्यात १ लिंबू पिळून घाला. हे मिश्रण व्यवस्थित मिसळा.  ३ ते ४ तासांसाठी केसांवर लावून नंतर केस  स्वच्छ धुवा.

बीटाचा हेअर मास्क

बीटाचा हेअर मास्क वापरल्यास तुमचे केस लाल होऊ शकता. हा हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला आवळा पावडर, मेहेंदी पावडर, बीटाचा रस आणि लिंबाचा रस एकत्र मिसळावा लागेल.  हे मिश्रण ३ ते ४ तासांसाठी तसंच ठेवा. त्यानंतर आपले केस स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास केसांवर चांगला परिणाम दिसून येईल.

Web Title: How to Color Black Hair Burgundy using Beetroot : How to color naturally at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.