आजकाल पांढऱ्या केसांची समस्या वाढत चालली आहे (Hair care Tips). कमी वयात केस पांढरे होणं ही एक सामान्य बाब आहे. पांढरे केस झाल्यानंतर आपण ब्यूटी पार्लरमध्ये धाव घेतो. मात्र, ब्यूटी पार्लरमधील (Beauty Parlour) उत्पादने केमिकल रसायनयुक्त असतात. ज्यामुळे केस खराब होण्याची शक्यता जास्त असते (Hair Care Tips).
केसांच्या काळजीशी संबंधित कमतरतांमुळेही केस पांढरे (Grey Hairs) होण्याची समस्या उद्भवते. केस काळे करण्यासाठी आपण सहसा मेहेंदीचा वापर करतो. मात्र, मेहेंदीचा वापर केल्यानंतर केस काळे होण्याऐवजी लाल होतात. लाल केसांमुळे आपला पूर्ण लूक बिघडतो. केस खराब होऊ नये, शिवाय मेहेंदी लावल्यानंतर केस काळे होण्यासाठी त्यात १ गोष्ट मिसळा. ही गोष्ट मिसळताच. केस पूर्णपणे काळे होतील(How to Color Your Hair with Henna and Coffee).
सकाळी पोट साफ होत नाही? चपाती खाऊन पोट डब्ब होतं? कणकेत मिसळा '१' पिवळी पावडर; चपात्या होतील मऊ
केस काळे करण्यासाठी मेहेंदी 'या' पद्धतीने लावा
- केस काळे करण्यासाठी फक्त पाण्यात मेहेंदी मिसळून लावू नका. यामुळे केस लाल होऊ शकतात. केसांचे पोत बिघडू नये, शिवाय केस काळे करण्यासाठी मेहेंदीमध्ये कॉफी पावडर मिसळा. कॉफीमुळे स्काल्प क्लिन होते. यासह केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.
बॅड कोलेस्टेरॉल ते फॅटी लिव्हर, 'या' डाळीचं पाणी प्या रोज; पचनक्रिया सुधारेल - हृदयही राहील निरोगी
- यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये पाणी घ्या. त्यात मेहेंदी पावडर घालून मिक्स करा. आपण त्यात आवळा पावडरही मिक्स करू शकता. नंतर मिश्रण लोखंडी तव्यावर काढून घ्या. नंतर त्यात कॉफी पावडर घालून मिक्स करा.
- कॉफीमध्ये विटामिन्ससह अनेक पोषक तत्व असतात. कॅफीनमुळे केसांची वाढ होण्यास अधिक मदत मिळते आणि केसांना सुंदर रंगही येतो. त्यामुळे कॉफीचा वापर अवश्य करा.
- त्यानंतर मिश्रण केसांना लावा. काही वेळानंतर पाण्याने धुवा. त्याच्या दुसऱ्या दिवशी शाम्पूने केस धुवा. यामुळे केसांवरील रंग सहसा धुतल्यानंतर लवकर निघणार नाही.