Lokmat Sakhi >Beauty > केस रंगवूनही महिनाभरातच पुन्हा पांढरे होतात? १ मस्त उपाय, किमान २ महिने केस राहतील काळेभोर 

केस रंगवूनही महिनाभरातच पुन्हा पांढरे होतात? १ मस्त उपाय, किमान २ महिने केस राहतील काळेभोर 

How To Colour Hair Without Using Mehendi Or Dye: मेहेंदी, डाय लावल्यानंतर केस पुन्हा काही दिवसांत पांढरे दिसू लागतात. त्यामुळेच आता केसांचा रंग जास्त दिवस टिकण्यासाठी हा उपाय करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2024 01:03 PM2024-05-28T13:03:19+5:302024-05-28T13:04:24+5:30

How To Colour Hair Without Using Mehendi Or Dye: मेहेंदी, डाय लावल्यानंतर केस पुन्हा काही दिवसांत पांढरे दिसू लागतात. त्यामुळेच आता केसांचा रंग जास्त दिवस टिकण्यासाठी हा उपाय करून पाहा..

how to colour hair without using mehendi or dye, best home remedy for gray hair, how to turn gray hair into black | केस रंगवूनही महिनाभरातच पुन्हा पांढरे होतात? १ मस्त उपाय, किमान २ महिने केस राहतील काळेभोर 

केस रंगवूनही महिनाभरातच पुन्हा पांढरे होतात? १ मस्त उपाय, किमान २ महिने केस राहतील काळेभोर 

Highlightsसगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि एखाद्या लोखंडी कढईमध्ये टाकून रात्रभर भिजत ठेवा.

केस पांढरे होणं ही समस्या आता खूप कमी वयातच दिसून येत आहे. हल्ली कॉलेजमध्ये जाणाऱ्या कित्येक मुला- मुलींचे केसही पांढरे झालेले असतात. आता पांढरे केस लपविण्यासाठी त्यांना डाय, मेहेंदी, कलर करावं लागतं. पण एवढ्या लहान वयात डाय किंवा कलर करण्याची भीती वाटते, तसेच वारंवार मेहेंदी लावण्याचाही कंटाळा येतो. म्हणूनच आता हा एक सोपा उपाय करून पाहा (best home remedy for gray hair). हा उपाय केल्यामुळे केसांना छान काळाभोर रंग तर येईलच (how to turn gray hair into black). पण एकदा हा उपाय केला तर पुढचे २ महिने तरी केसांचा रंग कमी होणार नाही, असं सांगितलं आहे. (how to colour hair without using mehendi or dye)

 

मेहेंदी, डाय न वापरता केस कलर करण्याचा उपाय

हा उपाय kitchenaapketipshumare या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये केसांना कलर करण्यासाठी घरगुती पद्धतीने हेअर कलर कसा तयार करावा हे सांगितलं आहे.

भारत, इजिप्तमध्ये पुरातन काळापासून दाट- लांब केसांसाठी वापरली जाते भेंडी, बघा ३ चमत्कारिक फायदे

हा उपाय करण्यासाठी आपल्याला ४ ते ५ विड्याची पानं, ८ ते १० तुळशीची पानं, ४ ते ५ जास्वंदाची पानं, १ टेबलस्पून कलौंजी, १ टेबलस्पून कॉफी पावडर लागणार आहे.

हे सगळं साहित्य १ ग्लास पाण्यात टाका आणि ते पाणी अर्धे होईपर्यंत आटू द्या. आता यानंतर पाणी थोडं कोमट झालं की गाळून घ्या आणि लोखंडाच्या कढईमध्ये टाका. 

 

आता त्या पाण्यात १ चमचा जास्वंदाच्या फुलांची पावडर टाका. ही पावडर दुकानातून किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवरून घेऊ शकता. तसेच १ चमचा आवळा पावडर आणि १ चमचा दही टाका. 

चष्म्याच्या काचा स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक, फक्त १ मिनिटाचा उपाय- काचांवर स्क्रॅचेस येणारच नाहीत

सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि एखाद्या लोखंडी कढईमध्ये टाकून रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्यादिवशी सकाळी ते केसांना लावा आणि त्यानंतर २ तासांनी केस धुवून टाका. केसांना काळाभोर रंग येईल. 


 

Web Title: how to colour hair without using mehendi or dye, best home remedy for gray hair, how to turn gray hair into black

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.