Join us

पांढरे केस कमीच होत नाही? डॉक्टर सांगतात हा घरगुती डाय केसांना लावा, ६ महिने काळे राहतील केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 23:36 IST

How To Colour White Hairs Black : हा उपाय इतका इफेक्टिव्ह आहे की ६ महिने याचा रंग निघणार नाही.

आपल्यापैकी बरेच जण केस पांढरे होण्याच्या समस्येनं त्रस्त असतात. अनेकदा डाय लावूनही केसांवर चांगला परिणाम दिसत नाही.  केमिकल्स वारंवार केसांना लावल्यामुळे केस अजूनच खराब होतात.  केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी तुम्ही  काही घरगुती उपाय करू शकता. (Hair Care Tips) आयुर्वेदीक डॉक्टर निशांत गुप्ता यांनी  काही घरगुती उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे तुमचे पांढरे केस काळे होण्यास मदत होईल.

हा उपाय इतका इफेक्टिव्ह आहे की ६ महिने याचा रंग निघणार नाही. हा उपाय  करण्यासाठी तुम्हाला चहा पावडर आणि मुर्दा सिंघी या जडीबूटीचा वापर करू शकता. (How To Colour White Hairs Black Know Effective Harbal Dye Recipe By Doctor Nishant Gupta)

डॉक्टर निशांत यांनी  सांगितला कमालीचा फॉर्म्यूला

डॉ. निशांत सांगतात की  तुम्ही एकदा हा उपाय केला तर ६  महिने तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे राहतील आणि ६ महिने मेहेंदी टिकून राहील. केस काळे करण्याचं द्रावण कसं तयार करायचं ते पाहूया.

चहा पावडर - २ चमचे

मेहेंदी पावडर - २ चमचे

खाण्याचा चुना - अर्धा चमचा

मुर्दा सिंगी- अर्धा चमचा

मोहोरीचं तेल - गरजेनुसार

सगळ्यात आधी एक बाऊल घेऊन त्यात २ चमचे वाटलेली चहा पावडर घाला. नंतर त्यात १०० ग्रॅम मेहंदी पावडर,  खाण्याचा चुना,  मूर्दा सिंघी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.  यात  मोहोरीचं तेल घालून व्यवस्थित मिक्स करा. हे द्रावण जास्त घट्ट किंवा जाड नसेल याची काळजी घ्या. केसांना २० मिनिटं लावून सुकण्यासाठी ठेवा. नंतर साध्या पाण्यानं केस धुवा. हा उपाय केल्यास तुम्हाला केस काळे झालेले दिसून येतील. हा १ सिक्रेट फॉर्म्यूला  आहे. हा सिक्रेट फॉर्म्यूला तुम्हाला इतर कोणीही सांगू शकत  नाही.

चहा गाळण्याच्या गाळणीमुळे होऊ शकतो कॅन्सर; चहा करताना १ चूक करणं टाळा, सुरक्षित राहाल

ही एक दगडाप्रमाणे दिसणारी जडीबूटी असते. अनेक सौंदर्य उत्पादनात याचा वापर केला जातो. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी हे फार महत्वाचे असते.  यातील नैसर्गिक मिनरल्स  केसांना पोषण देतात याशिवाय केस मजबूत होतात. पिंपल्स , एक्ने, डार्क  स्पॉर्ट्स, एक्जिमा, सूज यांसारखे स्किन प्रॉब्लेम्स उद्भवत नाहीत.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी