कांदा सर्वांच्याच स्वयंपाकघरात असतो. याच कांद्याचा वापर करून तुम्ही पांढरे केस काळे करू शकता याशिवाय केसांची मजबूती वाढवू शकता. वयोमानानुसार अनेकांची केस गळायला लागतात. खाण्यापिण्याच्या सवयी व्यवस्थित नसणं, हार्मोनल बदल, वैद्यकीय स्थिती किंवा प्रेग्नंसीनंतर केस गळणं ही केस गळण्याची सामान्य कारणं आहेत. केस वाढवण्यासाठी बाजारात अनेक उत्पादनं उपलब्ध असतील तरी प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे असते, शारीरिक क्षमता वेगळ्या असतात त्यानुसार बदल जाणवत असतो. (How to control hair fall using onion)
सगळ्यात आधी एका कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात चिरलेले कांदे घाला. कढीपत्त्याची पानं घाला, १ चमचा ब्लॅक सिड्स (कलौंजी) घाला, १ चमचा मेथी घाला. ५ मिनिटं हे मिश्रण गरम केल्यानंतर गाळून घ्या. मिश्रण गाळून घेतलं की स्काल्पला तेलानं मसाज करा. नेहमी करतो त्याप्रमाणे डोक्याची मसाज केल्यानंतर २ तासांनी केस धुवा किंवा रात्री तेल लावल्यानंतर तुम्ही सकाळीसुद्धा केस धुवू शकता. इतर महागड्या तेलांपेक्षा हे तेल केसांना लावल्यास तुम्हाला चांगले परीणाम दिसून येतील.
कांद्यात एंटी बॅक्टेअल, एंटी फंगल आणि एंटी ऑक्सिडेंट्स गुणधर्म असतात त्यामुळे केसांचा चांगला विकास होतो. आणि त्यातील सल्फर केलांना दाट आणि चमकदार बनवते. कांद्याच्या रसानं केसांमध्ये ब्लड सर्क्युलेशनही व्यवस्थित राहते. यामुळे केस नैसर्गिकरित्या मजबूत होतात आणि वेगानं वाढतात.
दंड, हाताची बोटं काळवंडली? १० रूपयात पार्लरसारखं मेनिक्युअर घरीच करा-ग्लोईंग दिसेल त्वचा
ऑलिव्ह ऑईलमध्ये कांद्याचा रस मिसळून केसांच्या मुळांना लावल्याने किंवा मसाज केल्याने केस लांब आणि मजबूत होतात. अर्धा कप कांद्याच्या रसात दोन चमचे मध मिसळा आणि केसांच्या मुळांमध्ये चांगली मसाज करा. केसांची वाढ चांगली होते तसेच केसांमध्ये ताकदही येते.
१५ दिवसांत केसांची चांगली वाढ होईल; फक्त झोपताना १ उपाय करा, दाट-लांब केसांचा फॉर्म्यूला
३ चमचे मेथीचे दाणे बारीक करून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना बारीक करून घट्ट पेस्ट बनवा. त्यानंतर त्यात दोन चमचे कांद्याचा रस मिसळा आणि केसांच्या मुळांमध्ये चांगला लावा. साधारण अर्धा तास तसंच राहू द्या. आता कोमट पाण्याने धुवा त्यामुळे केसांचा पोत सुधारेल आणि वाढही पटापट होईल.