Join us  

नेहमी गळतात त्यापेक्षा पावसाळ्यात तिप्पट जास्त गळतात केस, तज्ज्ञ सांगतात अशावेळी काय करावे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2023 12:07 PM

How to control hair loss during monsoon? पावसाळ्यात केस नेहमीपेक्षा जास्त का गळतात?

प्रत्येक भागात पाऊस पडत आहे. काही भागात मुसळधार तर, काही ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरी बरसत आहे. पावसाळा हा ऋतू आनंद तर देतोच यासह, त्याचे काही तोटे देखील आहे. पावसाळ्यात त्वचा आणि केसांच्या निगडीत अनेक समस्या निर्माण होतात. मुख्य म्हणजे अनेक महिलांना केस गळतीची समस्या निर्माण होते. मात्र, पावसाळ्यातच केस गळती का होते? केस गळतीची समस्या कशी थांबवावी?

यासंदर्भात, यूपी, कानपूरमधील जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक आणि त्वचाशास्त्रज्ञ, डॉ. युगल राजपूत सांगतात, पावसाळ्यात केसांची काळजी घ्यायला हवी. वारंवार पावसात भिजल्याने स्काल्पवर फंगल इन्फेक्शन होऊ शकते, ज्यामुळे केसांची मुळं कमजोर होतात. अशा स्थितीत हेअर फॉल होते''(How to control hair loss during monsoon?).

पावसाळ्यात दररोज ३०० केस गळतात

तज्ज्ञांच्या मते, '' केस धुताना किंवा विंचरताना १०० केस गळणे सामान्य आहे. परंतु, पावसाळ्यात याहून अधिक केस गळतात. अशा स्थितीत केसांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. केस गळणे टाळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत. पावसाळ्यात केसांना जास्त तेल लावू नये, असे केल्याने केस गळण्याची समस्या आणखी वाढू शकते.

- पावसात भिजणे टाळावे आणि केस ओले झाले असतील तर, ते लवकर वाळवावेत. असे केल्याने बुरशीजन्य संसर्गाचा धोका कमी होईल व केसगळतीपासूनही सुटका मिळेल.

व्हिटामिन ई केसांना नक्की कसे लावायचे? पाहा २ व्हिटामिन ई कॅप्सुल केसांवर काय कमाल करतात...

- केसगळती रोखण्यासाठी आंघोळीपूर्वी केसांना खोबरेल तेल लावून मसाज करा. असे केल्याने टाळूचा कोरडेपणा दूर होईल, व केस गळती थांबेल. आठवड्यातून एक ते दोन वेळा केसांना तेलाने मसाज करा.

- केस मजबूत करण्यासाठी आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करावा. आपण डाळ, सोयाबीन, कॉटेज चीज या पदार्थांचे सेवन करू शकता.

पावसाळ्यात चिखलांतून वाट काढताना पाय काळवंडले? ४ घरगुती उपाय- पाय दिसतील स्वच्छ

- हंगामी फळांचे सेवन करणे केसांसाठी उत्तम मानले जाते. केस मजबूत ठेवण्यासाठी हंगामी फळे खावीत. यामुळे केसांना झिंक, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे मिळतात. लापशी आणि खिचडी यांसारखी कच्ची तृणधान्ये खाणे देखील केसांसाठी फायदेशीर ठरते.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स