Join us  

काखेत खूपच घाम येतो- हात वर करताच घामाची दुर्गंधी? १ सोपा उपाय करा, परफ्यूम मारण्याचीही गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2023 11:55 AM

How To Control Sweating In Armpits Or Underarms?: काखेत खूप घाम येऊन सतत ती जागा ओलसर राहात असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा...

ठळक मुद्देसकाळी आंघोळ झाल्यानंतर आणि झोपण्यापुर्वी हा स्प्रे काखेत मारा. घाम येण्याचं प्रमाण कमी होईल आणि त्यामुळे आपोआपच दुर्गंधीही कमी होईल. 

उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा खूपच शारिरीक कष्ट झाले तर अशावेळी घाम येऊन काखेमध्ये ओलसर होणं समजण्यासारखं आहे. पण काही जणींना सतत खूप घाम येतो (How to get rid of excess sweating?). हात वर करताच ती जागा खूप घामेजून ओली झालेली दिसते आणि घामाची दुर्गंधी येते. असा त्रास होत असेल तर मग चारचौघांसमोर हात वर करायलाही नकोसं वाटतं. बऱ्याचदा घामाचा दुर्गंध एवढा असतो की परफ्यूम मारूनही तो लपत नाही ( Home remedies for sweat odour?). म्हणूनच अशी अडचण तुमचीही होत असेल तर हा एक उपाय करून पाहा. यामुळे घाम येण्याचं आणि दुर्गंधीचं प्रमाण कमी होईल. (How to control sweating in underarms?)

 

काखेत खूप घाम येत असल्यास सोपा घरगुती उपाय

हा उपाय इन्स्टाग्रामच्या theglobalistagirl या पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी गुलाबपाणी, तुरटीची पावडर आणि कोणत्याही फ्लेवरचं इसेंशियल ऑईल अशा फक्त ३ गोष्टी लागणार आहेत.

डोळ्यांभोवती बारीकशा सुरकुत्या आणि डार्क सर्कल्स? २ मिनिटांचा सोपा उपाय, काळी वर्तुळं- सुरकुत्या होतील कमी

सगळ्यात आधी एका भांड्यात एक वाटी गुलाब पाणी घ्या. त्यात १ टेबलस्पून तुरटीची पावडर आणि इसेंशियल ऑईलचे ५ ते ६ थेंब टाका.

हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून एकत्र करून घ्या आणि ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.

सकाळी आंघोळ झाल्यानंतर आणि झोपण्यापुर्वी हा स्प्रे काखेत मारा. घाम येण्याचं प्रमाण कमी होईल आणि त्यामुळे आपोआपच दुर्गंधीही कमी होईल. 

 

घाम खूप येत असल्यास हे उपायही करा...

१. घामाची खूप दुर्गंधी येत असेल तर दररोज आंघोळीच्या एक बादली पाण्यामध्ये अर्धे लिंबू पिळून टाका. 

२. आंघोळीच्या पाण्याच्या बादलीमध्ये १ टेबलस्पून मीठ टाकून त्या पाण्याने आंघोळ करा.

परिणितीने लग्नात घातला होता Ecru रंगाचा घागरा, हा कोणता रंग असतो- काय त्याची खासियत? 

३. आंघोळीच्या पाण्याच्या बादलीत २ ते ३ थेंब इसेंशियल ऑईल टाकून आंघोळ केल्यानेही घामाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडी