कोणत्याही स्त्रीच्या चेहेऱ्याच्या सौंदर्यात तिचे केस महत्त्वाची भूमिका बजावतात. आजकाल प्रत्येकीलाच जाड, लांबसडक, काळेभोर केस हवे असतात. असे असले तरीही आपल्यापैकी प्रत्येकालाच काही ना काही केसांच्या समस्या असतातच. कमी वयातच केस पांढरे होणे, केसांत कोंडा होणे, केसगळती यांसारख्या अनेक समस्या आपल्याला सतावत असतात. वाढत्या वयाबरोबर केस पांढरे होणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु जर आपले केस लहान वयातच पांढरे होऊ लागले असतील तर काळजी वाटणे स्वाभाविक आहे.
केस अकाली पांढरे होणे ही अनेकांसाठी समस्या बनली आहे. हे पांढरे होणारे केस लपविण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध असलेले रसायनयुक्त हेअर डाईज अगदी सहजपणे वापरतो, जे केसांसाठी हानिकारक ठरू शकतात. या केमिकल्सयुक्त हेअर डाईजचा सतत वापर केल्यास केसांच्या समस्या थांबण्याऐवजी आणखीनच वाढू लागतात. यातील केमिकल्स हे केसांच्या वाढीवर किंवा त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यावर विपरीत परिणाम करु शकते. त्यामुळे केस काळे करण्यासाठी आपल्यापैकी बरेचजण हेअर डाईज शिवाय इतर नैसर्गिक पर्याय शोधत असतात. यासाठीच पूर्वीपासून केसांसाठी वापरत आलेले आवळा व शिकेकाई पावडर यांचा वापर करून आपण केसांचे हरवलेले सौंदर्य पुन्हा परत आणू शकतो(How To Convert Grey Hair To Black Naturally by Using 2 simple Ingredients).
केस नैसर्गिकरित्या काळे करण्याचा एक सोपा उपाय...
केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी आवळा व शिकेकाई पावडरचा वापर आपण करु शकतो. या दोन नैसर्गिक गोष्टींपासून तयार झालेला हेअर मास्क वापरून आपण केस नैसर्गिकरित्या काळे करु शकतो. एका मोठ्या भांड्यात ३ ते ४ टेबलस्पून खोबरेल तेल ओतून घ्यावे. आता या तेलात २ मोठे चमचे आवळा पावडर घालावी. हे मिश्रण चमच्याने व्यवस्थित ढळवून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण गॅसच्या मंद आचेवर ठेवून गरम करून घ्यावे. गरम केल्यानंतर हे मिश्रण थंड होण्यासाठी काही वेळ तसेच ठेवून द्यावे. मिश्रण थंड झाल्यानंतर एका गाळणीच्या मदतीने हे तेल गाळून घ्यावे. त्यानंतर हे तेल एका काचेच्या बाटलीत भरून ठेवावे. आठवड्यातून किमान दोन वेळा या तेलानें पांढऱ्या केसांना मसाज केल्यास केस काळे होण्यास मदत होते व केसांच्या सौंदर्यात भर पडते.
महागडे प्रयोग कशाला, ५ सोपे उपाय-केस गळणं बंद ! जावेद हबीब सांगतात सोपे स्मार्ट उपाय...
केस गळतीची समस्या कायमची संपवायची ? करा कढीपत्त्याच्या एक परफेक्ट उपाय...
आवळा व शिकेकाई पावडरचा हेअर मास्क...
केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी आपण आवळा आणि शिकेकाई पावडरचा हेअर मास्क बनवून देखील वापरू शकता. त्यासाठी आवळा आणि शिकेकाई पावडर घेऊन, लोखंडी कढईत प्रत्येकी दोन चमचे आवळा आणि शिकेकाई पावडर घालावी. त्यात थोडं पाणी घालून या दोन्ही पावडर पाण्यात व्यवस्थित मिसळून घ्याव्यात. त्यानंतर किमान दोन ते तीन तास हे मिश्रण असेच झाकून ठेवून द्यावे. हे मिश्रण व्यवस्थित भिजल्यानंतर केसांना हेअर मास्क प्रमाणे लावा आणि काही तास तसेच राहू द्या. यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. यामुळे आपले केस हेअर डाईज किंवा कृत्रिम रंगाशिवाय काळे होण्यास मदत होईल.
१ कांदा- १ कप खोबरेल तेल- पाहा या तेलाची जादू; केस गळती ते कोंडा- केसांच्या समस्या गायब!