Join us  

वय कमी पण केस खूप पिकलेत? ४ घरगुती उपाय, ना डाय- ना हेअर कलर, केस होतील काळेभोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2023 10:05 AM

How To Convert Grey Hair To Black Naturally :  केस काळे करण्यासाठी हेअर डाय हा पर्याय असला तरी  हेअर डाय वापरायला अनेकांना अजिबात आवडत नाही.  

आजकाल प्रत्येक घरातील १ ते २ व्यक्ती केस पांढरे होण्याच्या समस्येतून जात असतो. केस पांढरे होण्यानं आरोग्यावर फारसा फरक पडत नसला तरी मानसिक आरोग्यावर या बदलांचा परिणाम होत असतो. (How To Convert Grey Hair To Black Naturally) केस पांढरे झाल्यानं आपण वयाआधीच म्हातारे दिसतोय का, आपण जास्त वयस्कर वाटू का, लोक काय म्हणतील असे वेगवेगळे विचार येतात आणि माणसाचा आत्मविश्वास कमी होतो.  केस काळे करण्यासाठी हेअर डाय हा पर्याय असला तरी  हेअर डाय वापरायला अनेकांना अजिबात आवडत नाही.  काही सोपे  घरगुती करून तुम्ही पांढरे केस काळे करू शकता. यामुळे तुमचे केस केमिकल्सच्या संपर्कात न येता नैसर्गिकरित्या काळे होतील. (How get black hairs naturally)

कोरा चहा

चहाचा परिणाम केसांचा रंग बदलण्यावरही दिसून येतो. पांढऱ्या केसांच्या समस्येवर काळ्या चहाचा वापर करण्यासाठी एक ग्लास पाण्यात ब्लॅक टी बनवा. हे पाणी थंड करून केसांना लावा. केसांना लावल्यानंतर अर्धा तास सोडा. यानंतर केस धुवावेत. पांढरे केस काळे करण्यासाठी आठवड्यातून एकदा हा उपाय करा.

मेथी

मेथीचे दाणे बारीक करून पावडर तयार करा. या पावडरमध्ये 3 ते 4 आवळ्याचा रस आणि खोबरेल तेल मिसळा आणि पेस्ट तयार करा. हा हेअर मास्क डोक्याला लावा आणि तासभर ठेवल्यानंतर धुवा. चांगल्या प्रभावासाठी, आठवड्यातून एकदा हे केस मास्क लावा. केसांवर चांगला परिणाम दिसून येईल

कढीपत्ता

केस काळे करण्यासाठी कढीपत्ता अगदी सहज वापरता येतो. कढीपत्त्याच्या वापरासाठी 2 चमचे आवळा पावडर घ्या आणि त्यात 2 चमचे ब्राह्मी पावडर घ्या. कढीपत्ता बारीक करून या मिश्रणात मिसळा. केसांना प्रत्येक गोष्ट लावण्यासाठी यामध्ये हलके पाणी मिसळले जाऊ शकते. पाण्यात मिसळल्यावर हा मास्क केसांवर लावण्यासाठी योग्य ठरतो. साधारण तासभर केसांवर ठेवल्यानंतर धुवा.

नारळाचं तेल

खोबरेल तेल केसांना व्यवस्थित लावल्यास केस पांढरे होण्याची समस्या दूर होते.  एका भांड्यात खोबरेल तेल घेऊन त्यात लिंबाचा रस आणि भाजून पावडर केलेल्या कलौंजीच्या बिया मिसळा.  हे मिश्रण केसांना लावण्यापूर्वी ते कोमट गरम करा आणि नंतर ते मुळापासून टोकापर्यंत लावा. 1 ते 2 तास केसांवर ठेवा आणि नंतर केस धुवा. हे मिश्रण केस धुण्यापूर्वी लावता येते. त्यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे होऊ लागतात. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स