Join us  

५ सवयी सोडा, सुरकुत्या- वयवाढीच्या खुणा चेहऱ्यावर दिसणारच नाहीत, कायम दिसाल तरुण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 3:15 PM

How to Delay Aging Naturally : आजकाल अनेकांना काम आणि अभ्यासामुळे पुरेशी झोप लागत नाही.  पुरेशी झोप न घेण्याची सवय तुम्हाला लवकर वृद्ध होऊ शकते.

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोक कमी वयातच म्हातारे दिसू लागले आहेत. आपली दिनचर्या अशी झाली आहे की आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. (How to Delay Aging Naturally) अन्न आणि दिनचर्याही बिघडली आहे. आज अशाच काही सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यांमुळे लोक लवकर वृद्ध होतात. तुम्हालाही या सवयी असतील तर आजच त्या सोडा. अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो. (These bad fast aging habits are pushing you towards old age)

झोपेची कमतरता

आजकाल अनेकांना काम आणि अभ्यासामुळे पुरेशी झोप लागत नाही.  पुरेशी झोप न घेण्याची सवय तुम्हाला लवकर वृद्ध होऊ शकते. पुरेशी झोप न मिळाल्याने तणावाची समस्याही वाढते. आजच्या तरुणांमध्ये ही समस्या झपाट्याने वाढत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागतात आणि केस अवेळी गळायला लागतात. त्यामुळे माणूस म्हातारा दिसू लागतो.

अंगावरून पांढरं पाणी जातं, खाज येते? ५ उपाय, थकवा आणि पांढऱ्या पाण्याचा त्रास होईल दूर 

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी

बाजारात मिळणारे जंक फूड्स अनेकांना आवडीने खायला आवडतात. चरबीयुक्त, प्रक्रिया केलेले पॅक केलेले अन्न खाल्ल्याने तुमचे वय अकाली जास्त दिसू  शकते. या गोष्टींमध्ये खराब कोलेस्ट्रॉल असते, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल आणि तुम्ही लवकरच वृद्ध दिसू लागाल.

स्मोकिंग, ड्रिंकींग

बरेच लोक धूम्रपान आणि मद्यपान करतात. छंदासाठी सुरू केलेली दारू हळूहळू सवय बनते. याचे सेवन केल्याने आरोग्याला मोठी हानी होऊ शकते. जे लोक जास्त मद्यपान करतात आणि धुम्रपान करतात, ते लवकर वृद्ध दिसू लागतात.

जास्त ताण घेणं

आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, अति टेन्शनमुळेही लोक लवकर वृद्ध दिसू लागतात. जास्त ताण आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकतो. हे प्राणघातक आणि सायलेंट किलर मानले गेले आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा जास्त ताण न घेण्याचा प्रयत्न करा.

रक्तात घातक कोलेस्टेरॉल वाढवतात ५ पदार्थ; आजपासूनच खाणं सोडा, हाटॅ ॲटॅकचा टळेल धोका

कमी पाणी पिणं

निरोगी राहण्यासाठी अधिकाधिक पाणी पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. आपल्या शरीरात 60 टक्के पाणी असते. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास अनेक गंभीर आजार होऊ शकतात. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे तुमची त्वचा कोरडी होऊ लागते, त्यामुळे त्वचेवर बारीक रेषा आणि काळी वर्तुळे दिसू लागतात.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स