Join us  

उन्हामुळे त्वचा लगेच काळी पडते? चमचाभर सायीचा करा ‘असा’ उपयोग की टॅनिंग निघेल झटपट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 8:31 PM

How to Do a Facial at Home : दुधाच्या सायीमुळे त्वचा हायड्रेटेड आणि मॉइश्चरायझेशन राहते.

गरमीच्या वातावरणात सतत घाम येणं, सुर्याच्या किरणांचा प्रभाव यामुळे त्वचा काळी पडते. काळी पडलेली त्वचा पुन्हा पूर्वरत होण्यासाठी काहीजणांना महिनोंमहिने लागतात. तर काहीजणांना २ ते ३ आठवड्यात सकारात्मक परिणाम दिसतो. ( Fecial Steps at home) काळपट झालेली त्वचा पुन्हा ग्लोईंग करण्यासाठी फेशियल करतात तर काहीजण ब्लिच करतात. पण वारंवार या ट्रिटमेंट्स करून चेहऱ्याचा केमिकल्सशी संपर्क येतो.  प्रत्येकाच्याच घरी दुध असते. दुधावरच्या सायीचा वापर करून तुम्ही चेहरा उजळवू शकता. (How to Do a Facial at Home)

दुधाच्या सायीमध्ये जीवनसत्त्वे. त्वचेला पोषण देणारी खनिजे आणि निरोगी चरबी असते.  यामुळे त्वचा हायड्रेटेड आणि मॉइश्चरायझेशन राहते. हे पिगमेंटेशन, छिद्र आणि सुरकुत्या कमी करण्यास देखील मदत करते. घरच्या घरी क्रीमने फेशियल कसे करायचे ते जाणून घेऊया.

क्लिंजिंग

फेशियलची पहिली पाय म्हणजे चेहरा व्यवस्थित साफ करणे. यामुळे त्वचेची घाण निघून जाते. रंगातही सुधारणा होते. यासाठी चिमूटभर हळद पावडर घ्या आणि त्यात दोन चमचे क्रीम मिसळा, ते चांगले मिसळा आणि गोलाकार हालचालीत चेहऱ्यावर मसाज करा आणि कोमट पाण्याने धुवा.

स्क्रबिंग

स्क्रबिंगमुळे चेहऱ्याची डेड स्किन निघून जाते. त्वचा खोलवर स्वच्छ होते. स्क्रब बनवण्यासाठी दोन चमचे क्रीममध्ये एक चमचा तांदळाचे पीठ मिसळा. या दोन्ही गोष्टी नीट मिक्स करून पेस्ट बनवा, चेहऱ्यावर लावा आणि हळू हळू 5 मिनिटे स्क्रब करा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा.

मसाज

मसाज करण्यासाठी एका भांड्यात दोन चमचे क्रीम घ्या आणि त्यात गुलाबजलाचे काही थेंब मिसळून पेस्ट तयार करा. याने तुमच्या चेहर्‍याला 5 मिनिटे वर्तुळाकार हालचालीत मसाज करा. यामुळे चेहरा मुलायम होईल आणि चेहऱ्यावर ग्लोही येईल.

फेस पॅक

फेस पॅक बनवण्यासाठी  एका भांड्यात दोन चमचे क्रीम, एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळा. या सर्व गोष्टी नीट मिसळा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. हलक्या हातांनी ५ मिनिटे मसाज करा. 10 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा. तुमची त्वचा देखील सायीसारखी मऊ होईल. टॅनिंग आणि रॅशेसपासूनही सुटका मिळेल.

टॅग्स :त्वचेची काळजीआरोग्यहेल्थ टिप्स