Join us  

चेहरा डल, काळपट झालाय? घरीच फेशियल करून मिळवा ग्लोईंग त्वचा, ५ स्टेप्स-फ्रेश दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 12:59 PM

How to Do a Facial at Home : घरी फेशियल करणं अगदी सोपं आहे. यासाठी फेशियलच्या बेसिक स्टेप्स माहित असायला हव्यात. (How to Do a Facial at Home)

रोजच्या थकव्यामुळे चेहरा डल आणि काळा पडल्यासारखा वाटतो. (Skin Care Tips) सणांच्यावेळी घरात आणि ऑफिसमध्ये कामाचा ताण असल्यामुळे पार्लरमध्ये जायलाही वेळ मिळत नाही अशावेळी घरच्याघरी फेशियल करून तुम्ही ग्लोईंग चेहरा मिळवू शकता. (Easy Steps to do Fecial at Home) घरी फेशियल करणं अगदी सोपं आहे. यासाठी फेशियलच्या बेसिक स्टेप्स माहित असायला हव्यात. (How to Do a Facial at Home)

1) क्लिंजिंग

फेशियलची सगळ्यात पहिली पायरी क्लिंजिंग ही आहे. ही चेहरा स्वच्छ करण्यासाठी महत्वाची असते. तुम्ही मेकअप केला असेल तर मेकअप रिमुव्हरच्या मदतीनं चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर डाग काढून टाकण्यासाठी फेसवॉशचा वापर करा. यामुळे चेहरा स्वच्छ होण्यास मदत होईल.

2) एक्सफोलिएट

एक्सफोलिएटींगमुळे त्वचेतील डेड सेल्स कमी होता.  तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या एक्सफोलिएटींग स्क्रबचा वापर करू शकता. घरी बनवलेल्या फेशियल स्क्रबचा वापर फायदेशीर ठरू शकता. कॉफी आणि एलोवेरा क्लिअर जेलचा वापर तुम्ही स्क्रब बनवू शकता.

3) वाफ घ्या

एक्सफोलिएटनंतर तुमचा चेहरा फ्रेश दिसेल. त्यानंतर तुम्ही वाफ घेऊ शकता. घरच्याघरी स्टिमरच्या मदतीनं वाफ घ्या. त्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीत पाणी घ्या. पाणी जास्त उकळलेलं नसेल याची काळजी घ्या.  डोक्यावर टॉवेल घेऊन वाफ घ्या. ५ मिनिटांची वाफ चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरू शकेल.

4) ब्लॅकेट्स काढून टाका

ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी तुम्ही एक्सट्रॅक्टर टूलचा वापर करू शकता. आपल्या हातांनी सुद्धा ब्लॅकहेट्स काढून शकता. हात धुवून आपल्या बोटांवर टिश्यू पेपर ठेवून ब्लॅकहेड्च्या चारही बाजूंनी दाबा. यामुळे ब्लॅकहेड्स निघून जाणं सोपं होईल.

5) फेस मास्कचा वापर

फेस मास्कचा वापर तुम्ही घरच्याघरी करू शकता. जेल बेस्ड असो किंवा शीट बेस्ड. त्यासाठी दही, मध आणि एवाकॅडो मिक्स करा. घरच्याघरी फेसमास्क बनवू शकता. हा फेस मास्क तुमच्या चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटांसाठी लावून तसाच ठेवा. सुकल्यानंतर एका कापडाच्या मदतीनं काढून टाका.

6) चेहरा मॉईश्चराईज ठेवून मसाज करा

वर दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचं मॉईश्चरायजर वापरू शकता. याने हळूवार चेहऱ्याची मालिश करा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढण्यास मदत होईल चेहरा ग्लोईंग दिसेल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी