Join us  

चेहरा डल झाला-मेकअपही जमत नाही? अर्धा तास आधी घरी करा 'हे' फेशियल; ग्लोईंग दिसेल चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 8:52 PM

How to Do a Fecial At Home (Beauty Tips) : फेशियल करण्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही अगदी कमीत कमी खर्चात कमीत कमी वेळात तुम्ही सुंदर-टवटवीत चेहरा मिळवू शकता.

लग्नाला जायचं असेल किंवा घरात फंक्शन असेल तर आपण सुंदर, प्रेझेंटेबल दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. नेहमी पार्लरला जायला पुरेसा वेळ मिळतोच असं नाही. (Fecial Steps To Do At Home) पार्लरला न जाता घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने फएशियल करू शकता. ( How to Do a Natural Fecial At Home) फेशियल करण्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही अगदी कमीत कमी खर्चात कमीत कमी वेळात तुम्ही सुंदर-टवटवीत चेहरा मिळवू शकता. (Amazing Benefits Of Facials For Your Skin)

घरच्याघरी फेशियल कसे करावे? (How to Do Fecial At Home)

१) सगळ्यात एक बटाटा, लाल टोमॅटो किसून घ्या. किसलेले टोमॅटो आणि बटाटा एका रूमालात घालून त्याचा रस काढून घ्या. टोमॅटोच्या आणि बटाट्याचा रसात मुल्तानी माती, १ चमचा चमचा घाला. त्यात अर्धा लिंबू पिळून घाला किंवा त्यात गुलाबपाणी घालून हे मिश्रण चेहऱ्याला लावा.

२) १५ ते २० मिनिटं हे मिश्रण चेहऱ्याला लावून ठेवा त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल आणि चेहरा कायम टवटवीत दिसेल. होममेड नॅच्युरल फेशियल करणं खूप सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही.  

घरगुती फेशियल फायदेशीर का ठरतं? (Fecial Benefits For Skin)

बटाटा आणि टोमॅटो वापरून केलेल्या फेशियलमुळे स्किन व्हाईटनिंग होते, ताण-तणाव कमी होतो. डार्क सर्कल्स कमी होतात आणि चेहऱ्यावर तेज येते. त्वचा एक्सफोलिएट होण्यास मदत होते आणि सेंसिटिव्ह त्वचेसाठी उत्तम आहे. टोमॅटोमध्ये ब्लिचिंग प्रोपर्टिज असतात. ज्यामुळे टॅनिंग निघून जाण्यास  मदत होते. तसंच टोमॅटोमुळे डेल सेल्स निघून जातात आणि त्वचा ब्राईट होते. मुलताना माती एक नॅच्युर क्लिंजर असून यामुळे  त्वचेलला अनेक बेनिफिट्स मिळतात. ऑईल,  रिडक्शन, एक्ने ट्रिटमेंट, स्किन टोन लेव्हलिंग होते आणि त्वचाही ब्राईट होते.

बेसनाचा वापर सौंदर्याच्या उत्पादनांमध्ये पूर्वापार  केला जात आहे. ज्यामुळे  त्वचेतील डर्ट निघून जाणं, पोल्यूटंट कमी होणं, डेड सेल्स निघून जाणं यांसारख्या समस्या टाळता येतात. ज्यामुळे एक्ने कमी होतात.  लिंबात एसिडीट कन्टेट असतो. यात स्किन लाईटनिंग प्रॉपर्टिज असतात. ज्यामुळे डार्क स्पॉर्ट्स रिडक्शन होण्यास मदत होते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी