Lokmat Sakhi >Beauty > घरीच पार्लरसारखं पेडीक्युअर करता येते? टोमॅटो-लिंबाचा सोपा उपाय; टॅनिंग निघेल-पाय चमकतील..

घरीच पार्लरसारखं पेडीक्युअर करता येते? टोमॅटो-लिंबाचा सोपा उपाय; टॅनिंग निघेल-पाय चमकतील..

How to Do a Pedicure at Home to Remove Tan : आता हजारो रुपये खर्च करून पेडीक्युअर करण्याची गरज नाही; घरीच होतील पाय स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2024 01:09 PM2024-03-19T13:09:09+5:302024-03-19T15:16:54+5:30

How to Do a Pedicure at Home to Remove Tan : आता हजारो रुपये खर्च करून पेडीक्युअर करण्याची गरज नाही; घरीच होतील पाय स्वच्छ

How to Do a Pedicure at Home to Remove Tan | घरीच पार्लरसारखं पेडीक्युअर करता येते? टोमॅटो-लिंबाचा सोपा उपाय; टॅनिंग निघेल-पाय चमकतील..

घरीच पार्लरसारखं पेडीक्युअर करता येते? टोमॅटो-लिंबाचा सोपा उपाय; टॅनिंग निघेल-पाय चमकतील..

हल्ली महिला (Beauty Parlour) त्यांच्या त्वचेसह हातापायांची देखील विशेष काळजी घेऊ लागल्या आहेत. पार्लरमध्ये मेनीक्युअर आणि पेडीक्युअर करण्यात भरपूर पैसा खर्च करीत आहे. सध्या काही भागात उन्हाच्या झळा बसत आहेत. ज्यामुळे हातापायाची स्किन काळपट पडते. मुख्य म्हणेज पायांवरचे टॅनिंगचे (Tanning Removal) डाग काही केल्या निघत नाही. ज्यामुळे खर्चिक पेडीक्युअर करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय उरत नाही (Pedicure at Home). पण तुम्हाला माहिती आहे का?

टोमॅटो आणि लिंबाचा वापर करूनही आपण घरात पेडीक्युअर करू शकता. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. तर, हो आपण घरीच घरगुती साहित्यांच्या मदतीने पेडीक्युअर करू शकता (Beauty Tips). यामुळे काही मिनिटात पायांची डेड स्किन निघेल, आणि पाय स्वच्छ होतील(How to Do a Pedicure at Home to Remove Tan).

घरीच पेडीक्युअर कसे करायचे?

पेडीक्युअर करण्यासाठी लागणारं साहित्य

टोमॅटो

लिंबू 

बेकिंग सोडा 

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये टोमॅटोचा रस घ्या. त्यात समप्रमाणात लिंबाचा रस आणि चिमुटभर बेकिंग सोडा घालून मिक्स करा. अशा प्रकारे पायाचे टॅनिंग दूर करणारे पेस्ट तयार होईल.

महागडे फेशिअल-डी टॅन कशाला? टोमॅटो अन् बटाट्याने करा टॅनिंग दूर; १० रुपयात दिसेल तजेलदार चेहरा

पायाचे टॅनिंग दूर करण्यासाठी पेस्टचा वापर कसा करावा?

सर्वात आधी पाय स्वच्छ धुवून घ्या, आणि कोरड्या टॉवेलने पुसून घ्या. नंतर तयार पेस्ट संपूर्ण पायांवर लावा; आणि लिंबाच्या सालीने पाय घासा. यामुळे टॅनिंग, डेड स्किन आणि काळपट डाग निघतील. पाय आणखीन क्लिन करण्यासाठी आपण या उपायाचा वापर आठवड्यातून ३ ते ४ वेळा करू शकता.

स्किनसाठी टोमॅटोचे फायदे

टोमॅटो फक्त पदार्थाची चव वाढवण्यासाठी नसून, चेहऱ्यावरील तेज वाढवण्याचं कामही करते. कारण टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई आढळते. टोमॅटोतील हे गुणधर्म त्वचेच्या खोलवर जाऊन काम करतात. ज्यामुळे स्किन क्लिन होते. शिवाय तजेलदार दिसते.

अगदी १० रुपयांत घरीच करा हेअर स्पा; ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन महागडे स्पा केल्यासारखे चमकतील केस

स्किनसाठी लिंबाच्या रसाचे फायदे

लिंबाचे रस स्किन ग्लोइंगसाठी मदत करतात. याशिवाय, त्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेच्या आतील प्रदूषण आणि सूक्ष्म रॅडिकल्सचे नुकसान कमी करतात. यासह त्यातील आम्ल घटक डाग कमी करण्यास मदत करतात. आपण याचा वापर स्किनचे डाग कमी करण्यास करू शकता.

Web Title: How to Do a Pedicure at Home to Remove Tan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.