आपल्याला माहितीच आहे की त्वचा खूप टॅन झाली असेल, काळवंडली असेल तर त्वचेचं टॅनिंग काढून टाकण्यासाठी आपण ब्लीच करतो. फेशियल आणि क्लिनअप करण्याच्या आधीही ब्लीच करण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे टॅनिंग कमी होतं आणि त्वचेवर चांगला ग्लो येण्यास मदत होते. पण वारंवार पार्लरमध्ये जाणं होत नसेल किंवा मग त्यासाठी भरमसाठ पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर घरच्याघरीही (How to do bleach at home) तुम्ही घरातलंच साहित्य वापरून ब्लीच करू शकता. (Homemade bleach by using just 3 ingredients)
काही जणींची त्वचा खूप जास्त संवेदनशील असते. अशा सेंसिटिव्ह त्वचेला पार्लरमध्ये जाऊन केलेलं ब्लीच सहन होत नाही. कारण त्या ब्लीचमध्ये खूप जास्त हार्ड केमिकल्स असतात.
आलिया- अनुष्कासारखं परफेक्ट फिटिंगचं ब्लाऊज शिवायचं? १ सोपा उपाय- छान फिनिशिंग मिळेल
त्यामुळे मग चेहऱ्यावर ब्लीच लावताच त्वचेला चुणचुण होणे, खाज येणे, असा त्रास होतो. हा त्रास टाळण्यासाठी घरच्याघरी ब्लीच कसं करायचं ते पाहून घ्या. हा उपाय amita_makeover_ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
घरच्याघरी ब्लीच करण्याची पद्धत
हा उपाय करण्यासाठी आपल्याला बेसन पीठ, मध आणि टोमॅटो एवढंच सामान लागणार आहे.
सगळ्यात आधी वाटीमध्ये १ चमचा बेसन पीठ घ्या. त्यात १ चमचा मध घाला आणि जवळपास अर्ध्या टाेमॅटोचा रस घाला. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून त्याची पेस्ट करून घ्या.
लेगिंग्ज लवकर सैल होते- गुडघ्याच्या ठिकाणी झोळ पडतो? ४ टिप्स- लेगिंग्ज खराब होणार नाही
आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. १० ते १५ मिनिटांनी चेहऱ्यावरचा लेप वाळला की थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. किंवा अलगद हाताने चोळूनही तुम्ही तो लेप चेहऱ्यावरून काढून टाकू शकता. त्यानंतर चेहरा धुवून घ्या.
आठवड्यातून एकदा हा उपाय करा. चेहरा टॅन होणार नाही.