सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे कार्यक्रमात चेहरा छान दिसावा म्हणून अनेक जणी पार्लरमध्ये जाऊन महागडे डायमंड फेशियल करून घेतात. पण बऱ्याच जणींना कामाच्या व्यापामुळे पार्लरमध्ये जाणं होतच नाही. किंवा वेळ असला तरी एवढे भरमसाठ पैसे खर्च करण्याची इच्छा होत नाही. असं कोणतही तुमचंही कारण असेल तर घरच्याघरी डायमंड फेशियलसारखा ग्लो कसा मिळवायचा, याचा हा सोपा घरगुती उपाय बघा. (diamond facial like instant glow at home)
डायमंड फेशियल घरी कसं करायचं?
घरच्याघरी डायमंड फेशियलसारखा ग्लो मिळवायचा असेल तर काय उपाय करावा याविषयीचा एक व्हिडिओ indianbeautysecrets या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
यानुसार जर फेशियल करायचं असेल तर आपल्याला चार ते पाच घरगुती पदार्थ लागणार आहेत.
ढाबास्टाईल झणझणीत मसाला भाजी १० मिनिटांत तयार, त्यासाठी करून ठेवा 'हे' खास वाटण
त्यासाठी सगळ्यात आधी एक टेबलस्पून चिया सीड्स कच्च्या दुधात एक ते दीड तासासाठी भिजत ठेवा. यानंतर ते मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पेस्ट करून घ्या.
चिया सीड्सची पेस्ट एका वाटीत काढल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तांदळाचे पीठ, एक चमचा मध आणि एक चमचा एलोवेरा जेल घाला.
हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि हा लेप तुमच्या चेहऱ्याला, मानेला, गळ्याला लावा.
वडिलांच्या 'त्या' गोष्टीमुळे बदललं प्रिटी झिंटाचं आयुष्य, म्हणाली आज मी independent आहे कारण....
अर्ध्या तासाने कोमट पाण्याने चेहरा, मान, गळा धुवून घ्या. त्वचेवरचे टॅनिंग कमी होऊन त्वचा उजळ होईल. तसेच छान चमकदार दिसेल. आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्यास त्वचेमध्ये खूप चांगला फरक पडेल असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे