Lokmat Sakhi >Beauty > दिवाळीत दिव्यांसारखा लख्खं चमकेल तुमचा चेहरा! ४ सोप्या स्टेप्स, घरीच करा फेशियल- दिसाल सुंदर 

दिवाळीत दिव्यांसारखा लख्खं चमकेल तुमचा चेहरा! ४ सोप्या स्टेप्स, घरीच करा फेशियल- दिसाल सुंदर 

How To Do Facial At Home: पार्लरमध्ये जाऊन फेशियल करायला वेळ नसेल तर घरच्याघरी अतिशय सोप्या पद्धतीने फेशियल कसं करायचं ते पाहा..(4 steps facial at home)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2024 02:00 PM2024-10-30T14:00:32+5:302024-10-30T14:01:32+5:30

How To Do Facial At Home: पार्लरमध्ये जाऊन फेशियल करायला वेळ नसेल तर घरच्याघरी अतिशय सोप्या पद्धतीने फेशियल कसं करायचं ते पाहा..(4 steps facial at home)

how to do facial at home, 4 steps to do facial at home, home remedies for instant glow | दिवाळीत दिव्यांसारखा लख्खं चमकेल तुमचा चेहरा! ४ सोप्या स्टेप्स, घरीच करा फेशियल- दिसाल सुंदर 

दिवाळीत दिव्यांसारखा लख्खं चमकेल तुमचा चेहरा! ४ सोप्या स्टेप्स, घरीच करा फेशियल- दिसाल सुंदर 

Highlights धावपळीच्या वेळी घरगुती साहित्य वापरून घरच्याघरी अगदी कमीतकमी वेळात फेशियल कसं करायचं ते पाहा..

दिवाळीच्या कामांमध्ये आपण एवढ्या गुंतून जातो की नंतर मग स्वत:साठी वेळच मिळत नाही. दिवाळीच्या कित्येक दिवस आधीपासून आपली धावपळ, आवराआवरी, साफसफाई, खरेदी सुरू झालेली असते. या सगळ्या गडबडीत स्वत:कडे लक्ष देणं होत नाही. त्यामुळे मग जेव्हा ही सगळी धावपळ संपते त्यानंतर मात्र दिवाळी अगदी तोंडावर आलेली असताना आपल्या लक्षात येतं की आपला चेहरा खूपच खराब दिसतो आहे. त्वचा पार काळवंडून गेली आहे. त्यामुळे तिला खरोखरच थोडी काळजी घेण्याची गरज असते. पण नेमकं असं होतं की फेशियल, क्लिनअप करण्यासाठी पार्लरमध्ये जाण्याएवढा वेळ आपल्याकडे नसतो (home remedies for instant glow). म्हणूनच अशा धावपळीच्या वेळी घरगुती साहित्य वापरून घरच्याघरी अगदी कमीतकमी वेळात फेशियल कसं करायचं ते पाहा..(how to do facial at home?) 

 

घरगुती साहित्य वापरून फेशियल कसे करावे?

घरगुती साहित्य वापरून फेशियल कसे करावे, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ beautyremedies_drshobna या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

Diwali Vibes: नटूनथटून ऑफिसला जाताना मेकअप 'ओव्हर' होत नाही ना? ३ टिप्स- दिसाल आकर्षक

१. यामध्ये जी पहिली स्टेप सांगितली आहे त्यानुसार सगळ्यात आधी त्वचेची स्वच्छता करून घ्या. यासाठी १ चमचा तांदळाचं पीठ, अर्धा चमचा दही आणि थोडं फेसवॉश हे पदार्थ एकत्र घ्या आणि त्याने त्वचेची स्वच्छता करा. त्यानंतर चेहऱ्याला ५ ते ७ मिनिटांसाठी वाफ द्या. 

संध्याकाळी थोडीशी भूक लागते- एनर्जी डाऊन होते? 'या' बिया तोंडात टाका, तब्येतीसाठी खूपच फायदेशीर 

२. यानंतर चेहऱ्याला स्क्रबिंग करण्याची गरज आहे. त्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा कॉफी पावडर आणि १ चमचा मध घ्या. हे दोन्ही पदार्थ कालवून एकत्र करा आणि ते चेहऱ्याला लावून हलक्या हाताने २ ते ३ मिनिटे मसाज करा. यामुळे त्वचेवरचं डेड स्किन, टॅनिंग निघून जाईल.

 

३. यानंतर चेहरा धुवून घ्या आणि बदाम तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल एकत्र करून त्या मिश्रणाने चेहऱ्याला ५ ते ७ मिनिटे मसाज करा. यामुळे त्वचा छान मॉईश्चराईज होईल.

Diwali Decoration: कुंड्या- रोपं वापरून घर सजविण्याच्या खास टिप्स, पाहुण्यांसाठी करा सुंदर डेकोरेशन

४. त्यानंतर एका वाटीमध्ये २ चमचे तांदळाचं पीठ, १ चमचा मिल्क पावडर आणि १ चमचा दही घ्या. हे पदार्थ कालवून त्याचा फेसपॅक तयार करा आणि तो तुमच्या चेहऱ्यावर लावा. साधारण १५ ते २० मिनिटांनी फेसपॅक सुकला की हलक्या हाताने चोळून काढून टाका आणि चेहरा धुवून मॉईश्चराईज करा. बघा काही मिनिटांतच तुमच्या चेहऱ्यावर खूप छान ग्लो आलेला असेल. 


 

Web Title: how to do facial at home, 4 steps to do facial at home, home remedies for instant glow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.