Join us  

दिवाळी आली पण पार्लरला जायला वेळच नाही? घरच्याघरी ३ स्टेपमध्ये करा फेशियल; दिसाल एकदम फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2022 4:31 PM

How To Do Facial at Home Diwali Special : अगदी १५ मिनीटांत सोप्या स्टेप्स वापरुन आपण हे फेशियल करु शकतो.

ठळक मुद्देघरच्या घरी फेशियल केल्यानंतर चुकूनही उन्हात किंवा धुळीत जाऊ नका.पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंटपेक्षा कधीकधी घरच्या घरी केलेले उपायही चांगले ठरु शकतात.

दिवाळी म्हणजे वर्षातला मोठा सण. या सणाला आपण घराची रंगरंगोटी, एखादी छानशी ट्रीप, खरेदी असे सगळे काही प्लॅन करतो. यात घराची साफसफाई, फराळाची तयारी, नोकरी असं सगळं करता करता आपल्याला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच होत नाही. दिवाळीचा दिवस जवळ आला तरी आपल्याला मात्र पार्लरमध्ये जायला वेळ होतोच असे नाही. घरातल्या सगळ्यांचे सगळे करता करता आपल्याला स्वत:साठीच वेळ मिळत नाही. पण दिवाळीत आपण चांगले तर दिसायला हवे. कामाचा थकवा जाण्यासाठी आणि चेहरा उजळ दिसण्यासाठी पार्लरमध्ये जायला वेळ मिळाला नाही तरी घरच्या घरीही आपण फेशियल करु शकतो. आता हे फेशियल कसे करायचे असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल. तर अगदी १५ मिनीटांत सोप्या स्टेप्स वापरुन आपण हे फेशियल करु शकतो (How To Do Facial at Home Diwali Special). 

१. फेशिअल सुरूवात करण्याआधी केस नीट बांधून घ्या. फेशियलची सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली स्टेप म्हणजे क्लिंजिंग. चेहरा क्लिंजर लावून स्वच्छ धुवून घ्या. क्लिंजर नसेल तर २ चमचे दही, १  चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस हे मिश्रण वापरा. हा लेप चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावरची घाण निघून चेहरा स्वच्छ होण्यास मदत होईल. 

२. यानंतर तुमच्याकडे एखादं स्क्रब असेल तर त्याने चेहऱ्याला मसाज करा. चेहरा जोरजोरात न रगडता हलक्या हाताने मसाज करा. घरी स्क्रब नसेल तर सरळ दोन चमचे दूध घ्या, त्यात एक चमचा बेसन पीठ किंवा मसूर डाळीचे पीठ घाला. थोडा मध घालून हे सगळे चांगले एकत्र करा आणि या स्क्रबरने चेहरा स्वच्छ करा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. 

(Image : Google)

३. चेहरा स्क्रब केल्यानंतर तुमच्या नेहमीच्या मॉईश्चरायझरने चेहऱ्याला मसाज करा. नंतर बाजारात मिळणारे मुलतानी माती किंवा आणखी कोणते फेसपॅक असेल तर तो चेहऱ्याला १० मिनीटांसाठी लावून ठेवा. फेसपॅक वाळायला लागला की चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि पुन्हा मॉईश्चरायझर लावा. यानंतर उन्हात, धुळीच्या ठिकाणी जाणं टाळा.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्सत्वचेची काळजी