Lokmat Sakhi >Beauty > महागडं फेशियल कशाला करता? १० मिनिटांत घरीच करा सोपं फेशियल; चमकेल चेहरा-तेज येईल

महागडं फेशियल कशाला करता? १० मिनिटांत घरीच करा सोपं फेशियल; चमकेल चेहरा-तेज येईल

How To Do Fecial For Diwali : बाहेरील केमिकल्सयुक्त उत्पादनांच्या वापरापेक्षा घरगुती उपाय नेहमीच उत्तम ठरतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 11:44 AM2024-10-21T11:44:37+5:302024-10-21T15:59:01+5:30

How To Do Fecial For Diwali : बाहेरील केमिकल्सयुक्त उत्पादनांच्या वापरापेक्षा घरगुती उपाय नेहमीच उत्तम ठरतात.

How To Do Fecial For Diwali : Fecial For Diwali Skincare Facial For Glowing Skin | महागडं फेशियल कशाला करता? १० मिनिटांत घरीच करा सोपं फेशियल; चमकेल चेहरा-तेज येईल

महागडं फेशियल कशाला करता? १० मिनिटांत घरीच करा सोपं फेशियल; चमकेल चेहरा-तेज येईल

आपली त्वचा (Skin Care Tips)  नेहमी नैसर्गिकरित्या सुंदर दिसावी असं प्रत्येकालाच वाटतं. बऱ्याच स्त्रिया कोरोना काळात पार्लर बंद असल्यामुळे घरगुती उपायांकडे वळाल्या. (Diwali 2024)  इतकंच नाही तर आपले आवडते सिने कलाकारकही घरगुती उपायांवरच अवलंबून आहेत. बाहेरील केमिकल्सयुक्त उत्पादनांच्या वापरापेक्षा घरगुती उपाय नेहमीच उत्तम ठरतात. हे घरगुती उपाय करून तुम्ही पार्लरच्या तुलनेत जास्त ग्लोईंग त्वचा मिळवू शकता. (Fecial For Diwali)

दिवाळीच्या खास प्रसंगी प्रत्येक महिलेला आपल्या चेहऱ्यावर ग्लो हवा असतो. चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो मिळवण्यासाठी तुम्ही १० मिनिटांत फेशियल करू शकता. दिवाळीत सुंदर, ग्लोईंग त्वचा मिळवण्यासाठी हे १० मिनिटांचे फेशियल उत्तम ठरते. ३ स्टेप्सच्या मदतीने तुम्ही घरच्याघरी फेशियल करू शकता.  (How To Get Instant Glow in Diwali)

पहिली स्टेप

१) एक्सफोलिएट

फेशियल करण्यासाठी सगळ्यात आधी त्वचा एक्सफोलिएट करणं गरजेचं असतं. यासाठी तांदूळाचे पीठ आणि दुधाच्या मलईची आवश्यकता असते.  हे दोन्ही पदार्थ चेहऱ्यावर उत्तम ग्लो देतात. याशिवाय फेस स्क्रब बनवण्यासाठी तुम्ही एक चमचा तांदूळाचे पीठ, त्यात दुधाची साय व्यवस्थित मिसळू शकता किंवा चेहरा किंवा मानेवरचे सर्क्युलेशन एक्सफोलिएट करण्यास मदत होईल.

ओटी पोट-मांड्या जाड दिसतात? १ ग्लास पाण्यात हे २ पदार्थ घालून प्या, सुडौल दिसाल

घरात फेशियल करण्याची दुसरी स्टेप मसाज आहे. मसाज करण्याआधी चेहरा धुवून घ्या नंतर चेहऱ्यावर फेशियल क्रिम लावा त्यात दुधाची साय, एक चुटकी हळद आणि एक चमचा  बेसन मिसळा नंतर जाडसर पेस्ट तयार करून घ्या. यामुळे व्यवस्थित मसाज करा. काही मिनिटं आपला चेहरा आणि मानेला मसाज करा. ज्यामुळे स्किन बाहेरून हायड्रेट राहते आणि  चेहऱ्यावरील एक्स्ट्रा तेल निघून जाण्यास मदत होते. नंतर चेहऱ्यावर वाफ घ्या.

२) फेस पॅक

फेशियची तिसरी आणि शेवटची स्टेप म्हणजे फेस पॅक लावणं. फेस पॅक लावण्यासाठी दुधाच्या सायीत थोडं मध आणि चुटकीभर हळद मिसळून पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावा काहीवेळ तसंच सोडून द्या. काही मिनिटांनंतर चेहरा साध्या पाण्यानं धुवून घ्या. हा पॅक लावल्यानं चेहऱ्यावर पार्लरसारखा ग्लो येईल.

केस विरळ झालेत-वाढ खुंटली? डॉक्टर सांगतात हे ३ पदार्थ खा,भरभर वाढतील-दाट होतील केस

हे १० मिनिटांचे फेशियल केल्यानं चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो येईल आणि त्वचेच्या संबंधित समस्या उद्भवणार नाहीत. जसं की सनबर्न, पिंपल्स, बंद पोर्स, सुरकुत्या येणार नाही. हे फेशियल पूर्णपणे नैसर्गिक वस्तूंनी केलं जातं. याआधी पॅच टेस्ट नक्की करून घ्या. 

Web Title: How To Do Fecial For Diwali : Fecial For Diwali Skincare Facial For Glowing Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.