Lokmat Sakhi >Beauty > थंडी पडताच त्वचा ड्राय झाली? ४ स्टेप्समधे घरच्याघरी करा फ्रुट फेशियल, त्वचा होईल मऊ

थंडी पडताच त्वचा ड्राय झाली? ४ स्टेप्समधे घरच्याघरी करा फ्रुट फेशियल, त्वचा होईल मऊ

Skin Care Tips For Dry Skin In Winter: थंडी सुरू होताच त्वचा कोरडी पडल्यासारखी वाटते. असं होत असेल तर त्वचेचा कोरडेपणा घालविण्यासाठी घरच्याघरी हे फ्रुट फेशियल करून पाहा (How to do fruit facial at home?).

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2023 12:53 PM2023-11-16T12:53:31+5:302023-11-16T12:54:48+5:30

Skin Care Tips For Dry Skin In Winter: थंडी सुरू होताच त्वचा कोरडी पडल्यासारखी वाटते. असं होत असेल तर त्वचेचा कोरडेपणा घालविण्यासाठी घरच्याघरी हे फ्रुट फेशियल करून पाहा (How to do fruit facial at home?).

How to do fruit facial at home? papaya facial in just 4 steps, Home remedies for dry skin in winter | थंडी पडताच त्वचा ड्राय झाली? ४ स्टेप्समधे घरच्याघरी करा फ्रुट फेशियल, त्वचा होईल मऊ

थंडी पडताच त्वचा ड्राय झाली? ४ स्टेप्समधे घरच्याघरी करा फ्रुट फेशियल, त्वचा होईल मऊ

Highlightsपार्लरमध्ये जाऊन हा उपाय करण्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा घरच्याघरी फ्रुट फेशियल कसं करायचं ते पाहूया

दिवाळी सरली आणि वातावरणात गारवा जाणवू लागला. सकाळी आणि संध्याकाळी गारवा असतो तर दिवसभर ऊन असतं. या अशा वातावरणाचा परिणाम आता त्वचेवरही होत आहे. त्यामुळेच तर आता अनेक जणींची त्वचा उलतेय आणि काेरडी पडल्यासारखी वाटते (Home remedies for dry skin in winter). त्वचेचा काेरडेपणा घालविण्यासाठी अनेक घरगुती उपाय उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक उपाय आहे फ्रुट फेशियल. पार्लरमध्ये जाऊन हा उपाय करण्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा घरच्याघरी फ्रुट फेशियल कसं करायचं ते पाहूया (How to do fruit facial at home?).. हा उपाय करण्यासाठी आपण पपई वापरणार असून हा उपाय theglobalistagirl या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. (papaya facial in just 4 steps)

 

पपई वापरून घरच्याघरी फेशियल कसं करायचं?

३ ते ४ स्टेप्स होणारं हे फेशियल करण्यासाठी अवघे १५ ते २० मिनिटे लागणार आहेत.

४५ लाखांचा ड्रेस आणि ३ लाखांची पर्स! शाहरुख खानची लेक सुहानाची महागडी स्टाईल पाहा..

त्यासाठी सगळ्यात आधी चेहरा थोडा ओलसर करून घ्या आणि पपईच्या फोडीने चेहऱ्यावर २ ते ३ मिनिटे गोलाकार दिशेत मसाज करा. मसाज झाल्यानंतर चेहरा धुवून घ्या.

यानंतर साधारणपणे अर्धा ते एक मिनिट चेहऱ्याला वाफ द्या. 

 

वाफ घेऊन झाल्यानंतर एखाद्या जाडसर टॉवेलने घासून हनुवटीवरील, ओठांच्या बाजुंना असणारे तसेच नाकावर दिसणारे ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स काढून टाका. 

फराळाचं खाऊन कंटाळला असाल तर तोंडी लावायला करा गवारीच्या शेंगांचा झणझणीत ठेचा, तोंडाला चवच येईल...

यानंतर आता त्वचेवरची डेड स्किन काढून टाकण्यासाठी स्क्रब करावे. स्क्रब करण्यासाठी गव्हाचं पीठ आणि दूध यांचा वापर करावा. गव्हाच्या पीठात दूध टाकून त्याची थोडी घट्ट पेस्ट करा आणि या पेस्टने त्वचेवर मसाज करा. 

यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे त्वचेवर मास्क लावणे. यासाठी अर्धा टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल, अर्धा टेबलस्पून मध आणि १ टीस्पून ग्लिसरीन एका वाटीत एकत्र करा आणि तो मास्क त्वचेवर लावून ठेवा. ५ ते ७ मिनिटांत मास्क सुकला की चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. व्यवस्थित पुसूून कोरडा केला की आठवणीने मॉईश्चरायझर लावा. त्वचा छान मऊ होईल. 

 

Web Title: How to do fruit facial at home? papaya facial in just 4 steps, Home remedies for dry skin in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.