Join us  

पार्लरमध्ये जायलाच वेळ नाही ? फक्त ४ सोप्या स्टेप - चेहऱ्यावर येईल गोल्ड फेशियल केल्यासारखे सोनसळी तेज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2024 12:40 AM

How to Do step by step Gold facial at home with Natural ingredients : प्रत्येकवेळी पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशियल करणे शक्य होत नाही अशावेळी घरगुती गोल्डन फेशियल करण्याची सोपी पद्धत पाहूयात.

प्रत्येकजण आपले स्किन केअर रुटीन वेगवेगळ्या पद्धतीने फॉलो करतात. आपल्या त्वचेचे आरोग्य व सौंदर्य कायम टिकून राहण्यासाठी अनेक उपाय आपण करतो. स्किनकेअर रुटीन फॉलो करताना त्यात फेशियल हे नक्कीच केलं जात. स्किन फेशियल हे त्वचेसाठी अधिक फायदेशीर मानलं जात. फेशियल करण्याचे अनेक प्रकार असतात. यापैकी गोल्ड फेशियल हे इतर फेशियल ट्रिट्मेंट्सपेक्षा बरचसे महागडे असते(How to Do step by step Gold facial at home with Natural ingredients).

पार्लरमध्ये फेशियल केल्याचा ग्लो कायम आपल्या चेहेऱ्यावर दिसत राहावा, अशी प्रत्येकीची इच्छा असते. परंतु प्रत्येकवेळी पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशियल करणे शक्य होत नाही. अशावेळी घरच्या घरीच आपल्याला पार्लरसारखा गोल्ड फेशियलचा लूक मिळू शकतो. चेहऱ्यावर गोल्डन ग्लो येण्यासाठी पार्लरमधून महागडे गोल्ड फेशियल करण्याची गरज नाही. आपण घरगुती पद्धतीने देखील घरीच गोल्डन फेशियल करून शकतो. सोप्या ४ स्टेप्स मध्ये घरच्या घरी गोल्ड फेशियल करण्याची सोपी पद्धत पाहूयात(4 Steps to do Golden Facial At Home).

 घरच्या घरी गोल्ड फेशियल करण्याच्या सोप्या स्टेप्स कोणत्या ? 

स्टेप १ :- क्लिनिंग 

कोणत्याही प्रकारची ब्यूटी ट्रिटमेंट घेण्याआधी आपली त्वचा क्लिन असणे गरजेचे असते. गोल्डन फेशियल करण्याआधी चेहऱ्याची त्वचा स्वच्छ करणे अतिशय महत्वाचे असते. त्वचेवर ब्यूटी ट्रिटमेंट घेताना एखादी गोष्ट थेट त्वचेला लावल्यानंतर चेहऱ्यावरची घाणही त्यात चिकटते. यासाठी ब्यूटी ट्रिटमेंट करण्याआधी त्वचेचे क्लिनिंग करणे महत्वाचे असते. कापसाच्या बोळ्यावर थोडेसे दूध घेऊन याने स्किन क्लिनिंग करून घ्यावे. दूध फक्त चेहऱ्यावरील घाणच साफ करत नाही तर त्वचेवरील काळे डागही कमी करते.   

आता फक्त ५ सोप्या स्टेप्समध्ये घरच्याघरी करा बॉडी पॉलिशिंग, पार्लरमध्ये जाऊन मिळणार नाही इतका ग्लो!

स्टेप २ :- स्क्रबिंग

चेहेऱ्यावर गोल्डन ग्लो मिळवण्यासाठीची दुसरी स्टेप म्हणजे स्क्रबिंग. स्क्रबिंग केल्यामुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स निघून जाण्यास मदत मिळते. स्क्रबिंग करण्यासाठी एका बाऊलमध्ये, साखरेची बारीक पूड, मध आणि लिंबाचा रस घालून स्क्रबर तयार करा. हे स्क्रबर चेहऱ्यावर लावून साधारण ५ ते १० मिनिटे चेहरा स्क्रब करून घ्यावा आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवा. 

स्टेप ३ :- स्टिमिंग 

चेहरा स्वच्छ केल्यानंतर स्टिमिंग करून घ्यावे. यासाठी आपले डोके शॉवर कॅपने झाकून किमान ४ ते ५ मिनिटे चेहऱ्यावर स्टीम घ्यावा. जेणेकरून चेहऱ्याचे  पोर्स उघडतील. आता कॉटन बॉलच्या मदतीने चेहरा आणि मान पुसून टाका. आपण स्टिमिंगच्या पाण्यांत लवंग, लिंबाचा रस आणि कडुलिंबाची पाने टाकू शकता. हे सर्व आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत.

शाम्पूत तेल मिसळून केसांना लावावं का? तज्ज्ञ सांगतात, रिल पाहून ‘असं’ करत असाल तर..

स्टेप ४ :- फेसपॅक

फेसपॅक तयार करण्यासाठी एका भांड्यात १ चमचा खोबरेल तेल, १ चमचा मध, १/२ चमचा हळद, १ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा दही घालून चांगले मिसळा. आता ते चेहऱ्यावर लावा आणि ५ मिनिटे चेहऱ्यावर तसेच राहू द्या आणि थोड्यावेळाने चेहरा धुवा. अशाप्रकारे आपण घरच्या घरी गोल्डन फेशियल करु शकतो. सर्व स्टेप्स पूर्ण झाल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावावे.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी