Join us  

पार्लरमध्ये न जाता घरीच करा केसांवर केरेटीन ट्रिटमेंट; काहीच खर्च न करता केस होतील स्ट्रेट-मुलायम…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2023 3:00 PM

How To Do Hair Keratin Treatment At Home : केस छान सिल्की आणि शायनीही होण्यास मदत होईल

आपले केस सरळ असले तर आपल्याला कुरळे आवडतात आणि कुरळ असतील तर सरळ असावेत असे वाटते. पूर्वी असं वाटलं तरी त्यासाठी काही पर्याय उपलब्ध नव्हते पण आता तंत्रज्ञान खूप पुढे गेल्याने केसांवर विविध प्रकारच्या ट्रिटमेंटस करुन आपण आपल्याला हवा तसा केसांचा पोत बदलून घेऊ शकतो. भुरे आणि कुरळे असलेले केस कितीही नीट ठेवले तरी विस्कटलेले दिसतात. हेत सिल्की आणि स्ट्रेट केस असतील तर ते छान चमकदार आणि मुलायम दिसतात. त्यामुळे अनेक तरुणींना आपले केस सरळ असावेत असे वाटते. मग पार्लरमध्ये जाऊन केसांवर स्ट्रेटनिंग, रीबाऊंडनिंग, केरेटीन यांसारख्या ट्रिटमेंटस करुन घेतल्या जातात (How To Do Hair Keratin Treatment At Home). 

अशाप्रकारच्या ट्रिटमेंटससाठी हजारो रुपये तर खर्च होतातच पण केसांवर विविध प्रकारची केमिकल्स वापरल्याने केसांचा पोतही खराब होतो. असे होऊ नये यासाठी घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने आपण केसांवर केरेटीन ट्रिटमेंट करु शकतो. निक ब्युटी कॉर्नर या इन्स्टाग्राम पेजवर ही केरेटीन ट्रीटमेंट घरच्या घरी कशी करायची याची माहिती शेअर करण्यात आली आहे. अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी पदार्थ वापरुन केसांवर केरेटीन ट्रिटमेंट करण्यासाठीच्या स्टेप्स यामध्ये सांगितल्या आहेत. ज्यामुळे केस छान सिल्की आणि शायनीही होण्यास मदत होईल, पाहूया ही ट्रिटमेंट कशी करायची...

१. मिक्सरच्या भांड्यात १ चमचा दही आणि १ चमचा कॉफी घ्यायची. 

२. यामध्ये केळ्याची साले काढून १ केळं घालायचं. 

३. कोरफडीच्या झाडाचे १ पूर्ण पान सालासहीत तुकडे करुन यामध्ये घालायचे.

४. भांड्याचे झाकण लावून हे सगळे मिश्रण मिक्सरवर एकदम बारीक करुन घ्यायचे. 

५. एकसारखा हेअर पॅक तयार झाल्यावर तो एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा. 

६. हा पॅक केसांना नीट लावायचा आणि ४५ मिनीटे तसाच ठेवायचा.  

७. त्यानंतर केस नेहमीप्रमाणे माइल्ड शाम्पू आणि कोमट पाण्याने धुवायचे.

८. नैसर्गिक पदार्थ वापरल्याने केसांना कोणतीही हानी पोहचत नाही आणि केस अतिशय मुलायम होण्यास मदत होते 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीमेकअप टिप्सहोम रेमेडी