बिघडलेली जीवनशैली यासह केसांची योग्य निगा न राखल्यामुळे केस खराब होतात. केसांची योग्य काळजी घेण्यासाठी लोकं ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन हेअर ट्रिटमेंट घेतात. व काही ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करतात. तर काही नैसर्गिक उपायांचा वापर करून केसांची काळजी घेतात. केसांच्या अनेक समस्या आहेत. केसात कोंडा, केस गळणे, केस पांढरे होणे, यावर उपाय म्हणून आपण हेअर स्पा करू शकता.
ब्यूटी पार्लरमध्ये हेअर स्पा करण्यासाठी खूप पैसे खर्च होतात. व वेळ देखील खूप वाया जातो. जर आपल्या कमी वेळात, कमी खर्चात, सोप्या पद्धतीने घरच्या घरी हेअर स्पा करायचा असेल तर, ही ट्रिक नक्की वापरून पाहा. या ट्रिकमुळे केसांवर ग्लॉसी - शाईन लूक येईल(How to do Hair Spa at Home).
घरी हेअर स्पा कसे करायचे?
सर्वप्रथम, एका वाटीमध्ये आपल्या केसांच्या लांबीनुसार शाम्पू घ्या. त्यानंतर त्यात समप्रमाणात एलोवेरा जेल व गुलाब जल मिसळून पेस्ट तयार करा.
खोबरेल तेल रात्री लावा, सकाळी पहा जादू, पिवळे दात ते तुटकी नखे - समस्या गायब
तयार पेस्ट संपूर्ण केसांना लावा, व केस चांगले धुवून घ्या. हेअर वॉश केल्यानंतर केस सुकवून घ्या. या ट्रिकमुळे केस हेअर स्पासारखे चमकदार आणि मऊ होतील.
हेअर केअर रुटीन
केसांची निगा राखण्यासाठी आपण फ्लॅक्स सीड्सचा वापर करू शकता. फ्लेक्ससीड्सच्या वापराने केसांची वाढ सुधारते. यामध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे केस सुंदर - शाईन करतात. यासाठी आपण फ्लॅक्स सीड्सचं जेल तयार करून, नियमित केसांवर लावू शकता. ही प्रोसेस एका महिन्यापर्यंत फॉलो करा.
केस गळून विरळ झाले? रामदेव बाबा सांगतात 1 सोपा उपाय, केस होतील लांब घनदाट
हे जेल केस धुण्याच्या एक तास आधी लावा आणि नंतर केस धुवा. यामुळे केसांची लांबी वाढेल. त्याऐवजी आपण केसांना दही देखील लावू शकता. दह्यामध्ये बायोटीन नावाचा घटक असतो. केसांच्या वाढीसाठी हा घटक गरजेचा असतो. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. केसांच्या आतली त्वचाही यामुळे चांगली राहते.