आजकालची धूळ-माती, प्रदूषण, कडक सूर्यप्रकाश आणि धकाधकीचे जीवन याचाही आपल्या केसांवर परिणाम होत आहे. म्हणूनच केसांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. केसांची निगा राखण्यासाठी, केसांना पूर्ण पोषण देण्यासाठी आणि त्यांची चमक टिकवून ठेवण्यासाठी ठराविक वेळेत हेअर स्पा केला पाहिजे. (Easy steps of hair spa at home for ganesh chaturth) हेअर स्पाने केसांची वाढ होते. (How to do hair spa at home) हेअर कलरिंग किंवा स्ट्रेटनिंग करणाऱ्यांसाठी हेअर स्पा खूप महत्त्वाचा आहे.निर्जीव, कोरड्या आणि खराब झालेल्या केसांसाठी हेअर स्पा हा एक चांगला उपचार आहे. (How can I do hair spa at home naturally) घरच्याघरी हेअर स्पा करून तुम्ही गणेशोत्सवात चमकदार केस मिळवू शकता.
हेअर स्पा चे फायदे
हेअर स्पा उपचार फक्त स्प्लिट एंड्ससाठी आणि कोरड्या के संपसून सुटका मिळत नाही तर केस गळणे, टक्कल पडणे आणि कोंडा यासारख्या समस्यामपासून देखिल सुटका मिळते. हेअर स्पा करताना केसांना भरपूर मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते आणि नसा मजबूत होतात. सलूनसारखा हेअर स्पा घरी करण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत - हेअर ऑइल, शॅम्पू, कंडिशनर आणि हेअर मास्क. जाणून घ्या, हेअर स्पाची सोपी पद्धत.
हेड मसाज
हेअर स्पा करण्याची ही पहिली स्टेप आहे. मालिश करण्यासाठी, कोमट नारळ किंवा ऑलिव्ह तेल. तेल कोमट केल्यानंतर, टाळूला हलक्या हातांनी १५ ते २० मिनिटे मसाज करा. मसाज केल्याने रक्ताभिसरण आणि केसांची वाढ सुधारते.
केसांना स्टिम द्या
मसाज केल्यानंतर केसांना स्टीम देणे आवश्यक आहे. वाफ देण्यासाठी जाड कापसाचा टॉवेल गरम पाण्यात बुडवून पिळून घ्या. हा टॉवेल केसांभोवती घट्ट गुंडाळा. साधारण ५ ते १० मिनिटे असाच टॉवेल गुंडाळून ठेवा. त्यामुळे डोक्याला लावलेले तेल मुळांपर्यंत पोहोचते.
केस चांगले धुवा
केसानां वाफ दिल्यानंतर, केस सौम्य शाम्पूने धुवा. लक्षात ठेवा, केस धुण्यासाठी साधे पाणी वापरा. गरम पाणी वापरल्यास केस कमकुवत होऊ शकतात.
हेअर कंडिशनिंग करा
केसांना शॅम्पू केल्यानंतर चांगल्या दर्जाचे कंडिशनर लावणेही आवश्यक आहे. जर तुम्ही कंडिशनर वापरत नसाल तर उकळलेल्या चहाच्या पाण्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकूनही केसांना लावता येते. बीटरूट पेस्ट उत्तम कंडिशनर म्हणूनही काम करते. याशिवाय मठ्ठा किंवा आंबट दहीही केसांना लावता येते. जर तुम्ही दही वगैरे लावले तर अर्धा तास तसंच राहू द्या आणि त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा.
केसांना हेअर मास्क लावा
केसांना हेअर मास्क लावणे ही हेअर स्पाची शेवटची पायरी आहे. आपण घरी हेअर मास्क बनवू शकता. हेअर मास्क बनवण्यासाठी प्लास्टिकच्या भांड्यात दोन अंडी, एक चमचा मध आणि थोडे खोबरेल तेल मिसळा. जर तुम्ही अंडी खात नसाल तर पिकलेले केळं देखील खूप फायदेशीर आहे. हेअर मास्क हलक्या ओल्या केसांवर किमान ३० मिनिटे ठेवा नंतर केस सौम्य शाम्पूने धुवा