आपल्याला जर काही खास पार्टी, लग्न समारंभ, एखाद फंक्शन अटेंड करायचं असेल तर त्या आधी आपण पार्लरला नक्की जातो. परफेक्ट फंक्शन लूक आणण्यासाठी आपण पार्लरमध्ये, स्किन व हेअर संदर्भात अनेक ट्रिटमेंट घेतो. परंतु काहीवेळा कामाच्या गडबडीत आपल्याकडे पार्लरला जायला देखील वेळ नसतो. अशावेळी आपण घरच्या घरीच घरगुती उपाय वापरुन झटपट फंक्शन रेडी होतो. फंक्शन लूक म्हटलं की, मेकअप आणि हेअर ही सर्वात महत्वाची गोष्ट आलीच.
फंक्शन रेडी होताना आपण केसांच्या वेगवेगळ्या हेयरस्टाईल्स नक्कीच करतो. अगदीच नाही तर आपण हेअर स्ट्रेटनिंग किंवा हेअर स्मुदनिंग तर नक्कीच करतो. कामाच्या गडबडीत आपल्याला पार्लरला जायला वेळ नसेल तर आपण घरच्या घरी हेअर स्ट्रेटनिंग करु शकतो. सोप्या ५ स्टेप्स वापरुन आपण घरच्या घरी पार्लर सारखे हेअर स्ट्रेटनिंग करुन झटपट फंक्शन रेडी होऊ शकतो(How To Do Hair Straightening At Home : 5 Easy Steps).
झटपट हेअर स्ट्रेटनिंग करण्याच्या कोणत्या आहेत ५ स्टेप्स....
१. केस धुवून घ्यावेत : - केस स्ट्रेटनिंग करण्याआधी केस व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यावेत. केस स्ट्रेटनिंग करण्याआधी ते धुवून घेतले नाहीत तर स्ट्रेटनिंग हिटमुळे केसांना हानी पोहोचून ते रुक्ष, निस्तेज होऊ शकतात. केस धुण्यासाठी सौम्य, हायड्रेटेड शॅम्पूचा वापर करावा. केस स्ट्रेटनिंग करायच्या किमान १ दिवसआधी सूर्यफुलाचे किंवा खोबरेल तेल लावून ते हायड्रेटेड करुन घ्यावेत. रात्री तेल लावून सकाळी केस धुवून घ्यावेत. केस हायड्रेटेड करण्यासाठी आपण ऐलोवेरा जेल, तेल यांसारख्या गोष्टींचा वापर करु शकतो. ऐलोवेरा जेल, सूर्यफुलाचे किंवा खोबरेल तेल यांचा वापर करुन केस स्वच्छ धुतल्याने आपले केस स्ट्रेटनिंग करण्यासाठी तयार असतात.
२. केस व्यवस्थित सुकवून घ्यावेत :- केस धुतल्यानंतर त्यांना व्यवस्थित सुकवून घेणे देखील तितकेच गरजेचे असते. सुती कापडाने किंवा पाणी शोषून घेणाऱ्या टॉवेलने केस पुसून, सुकवून घ्यावेत. केस पुसताना ते खसखसुन किंवा रगडून पुसू नयेत. केस टॉवेलने रगडून पुसल्याने केसांच्या मुळांना इजा होऊ शकते. टॉवेलने केस पुसून जास्तीचे पाणी केसांतून निथळून जाऊ द्या. केस नैसर्गिक पद्धतीने वाळवून घ्यावेत ब्लो ड्रायर किंवा ड्रायरचा वापर करु नये. ड्रायरचा वापर केल्याने केस फ्रिझ होण्याची शक्यता असते.
३. केस विंचरुन घ्यावेत :- केस स्वच्छ धुवून व सुकवून घेतल्यानंतर केस सर्वप्रथम आधी विंचरुन घ्यावेत. केसांत जर गुंता झाला असेल तर गुंता सोडवून घ्यावा. केस मोठ्या दातांच्या कंगव्याने व्यवस्थित विंचरुन घ्यावेत. केस स्ट्रेटनिंग करण्याआधी गुंता सोडवून केस विंचरुन घ्यावेत.
४. हिट प्रोटेक्शन सीरमचा वापर करा :- केसांना हिट प्रोटेक्शन सीरम लावल्याशिवाय, कोणत्याही हिट स्टायलिंग टूल्सचा वापर केसांवर करु नका. असे कधी केल्यास केसांना हानी पोहोचून ते जळण्याची शक्यता असते. हिट स्टायलिंग टूल्समधून निघणाऱ्या अतिरिक्त हिटपासून केसांचा बचाव करण्यासाठी केसांना हिट प्रोटेक्शन सीरम लावावे. हेयर स्ट्रेटनिंग करण्याआधी केसांना हिट प्रोटेक्शन सीरम लावा. हिट प्रोटेक्शन सीरमचे ४ ते ५ थेंब हातांवर घेऊन मग केसांना लावून घ्यावे. जर आपल्याकडे हिट प्रोटेक्शन सीरम नसेल तर आपण एलोवेरा जेल देखील लावू शकता. स्टायलिंग टूल्सच्या हिटमुळे केसांची होणारी हानी कमी करण्यासाठी एलोवेरा जेल फायदेशीर ठरु शकत.
५. केसांना करा स्ट्रेटनिंग :- आता आपण केसांना स्ट्रेटनिंग करु शकतो. केस स्ट्रेटनिंग करण्याआधी स्ट्रेटनिंग टूल्सचे तापमान सर्वप्रथम तपासून घ्यावे. जर आपले केस खूपच खराब किंवा रुक्ष असतील तर स्ट्रेटनिंग टूल्सचे तापमान १०० ते १५० सेल्सियस ठेवावे. हेव्ही किंवा कुरळ्या केसांसाठी स्ट्रेटनिंग टूल्सचे तापमान १७० ते २०० सेल्सियस ठेवावे. केसांना स्ट्रेटनिंग करताना सगळ्यांचं केसांना एकदम एकाच वेळी स्ट्रेटनिंग करु नये. केसांचे ४ ते ५ भागांत विभाजन करून, एका वेळी एक भाग असे करून स्ट्रेटनिंग करावे. यामुळे केसांचा फार गुंता न होता सगळे केस व्यवस्थित स्ट्रेटनिंग केले जातील. केस स्ट्रेटनिंग करुन झाल्यानंतर केसांना हेअर सीरम लावण्यास विसरु नका. हेअर सिरम लावल्याने केस फ्रिझी होणार नाहीत व स्ट्रेटनिंग केसांवर बराच काळ टिकून राहील.